Warm Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या फक्त 1 ग्लास कोमट पाणी, हे आजार कायम राहतील दूर, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Warm Water Benefits: सकाळची सुरुवात आरोग्यदायी सवयींनी करणे हे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातील एक सोपी आणि प्रभावी सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी पिणे.
बीड: सकाळची सुरुवात आरोग्यदायी सवयींनी करणे हे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातील एक सोपी आणि प्रभावी सवय म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी पिणे. अनेक आयुर्वेदाचार्य आणि आरोग्य तज्ज्ञ या सवयीचा विशेष आग्रह धरतात कारण ही कृती शरीराच्या आतून स्वच्छता करण्यास मदत करते. याबद्दलचं डॉ. अपर्णा बोरचाटे यांनी माहिती दिली आहे.
कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. रात्रभर झोपल्यानंतर शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी कोमट पाणी पिल्याने पचनसंस्थेला चालना मिळते आणि शरीरातील टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर फेकले जातात. यामुळे त्वचा चमकदार राहते आणि अनेकदा पिंपल्ससारख्या समस्या दूर होतात.
advertisement
या सवयीचा दुसरा मोठा फायदा म्हणजे वजन कमी होण्यास होणारी मदत. कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा मध घालून घेतल्यास शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही सवय अत्यंत उपयुक्त ठरते.
तसेच कोमट पाणी पिण्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सकाळी पोट साफ न होणे ही अनेकांची सामान्य समस्या असते. कोमट पाणी पचनसंस्थेला उष्णता देऊन आतड्यांची हालचाल सुरळीत करते आणि नैसर्गिकरीत्या पोट साफ होते. परिणामी गॅस, अपचन आणि अॅसिडिटी सारख्या त्रासांपासून सुटका मिळते.
advertisement
शेवटी ही सवय हळूहळू शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि इम्युनिटी बळकट करते. यामुळे लहानसहान आजारांपासून संरक्षण मिळते. थोडक्यात दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे ही सवय दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे ही सवय आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच समाविष्ट करावी.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
June 18, 2025 7:39 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Warm Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या फक्त 1 ग्लास कोमट पाणी, हे आजार कायम राहतील दूर, Video