लठ्ठपणाकडे दुर्लक्ष नको! या गंभीर आजारांचे ठरु शकतो कारण, अशी घ्या काळजी

Last Updated:

प्रत्येक जण आपल्या स्वप्नांचा, जीवनातील आव्हानांचा पाठलाग करताना प्रचंड धावपळ करतो. त्यामुळे आपला आहार, विहार, जीवनशैली याकडे प्रत्येकाचेच दुर्लक्ष होत आहे आणि यामुळेच लठ्ठपणा सारखी समस्या डोके वर काढत आहे. पाश्चिमात्य देशांबरोबर भारतातही लठ्ठपणा वाढत चालला आहे. लठ्ठपणामुळे विविध आजार व्यक्तीला जडतात. हृदयविकार, हायप

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : प्रत्येक जण आपल्या स्वप्नांचा, जीवनातील आव्हानांचा पाठलाग करताना प्रचंड धावपळ करतो. त्यामुळे आपला आहार, विहार, जीवनशैली याकडे प्रत्येकाचेच दुर्लक्ष होत आहे आणि यामुळेच लठ्ठपणा सारखी समस्या डोके वर काढत आहे. पाश्चिमात्य देशांबरोबर भारतातही लठ्ठपणा वाढत चालला आहे. लठ्ठपणामुळे विविध आजार व्यक्तीला जडतात. हृदयविकार, हायपर टेन्शन, पाठदुखी, गुडघेदुखी, महिलांमध्ये वेगवेगळ्या आजार लठ्ठपणामुळे होतात. लठ्ठपणा टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि लठ्ठपणामुळे कोणकोणत्या आजारांचा धोका असतो? याबद्दच स्थूलता तज्ज्ञ अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली.
advertisement
लठ्ठपणा हा विविध आजारांचं माहेर घर असतो. लठ्ठपणामुळे हायपर टेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. त्याचबरोबर टाईप टू मधुमेह, तसेच विविध प्रकारचे कॅन्सर उद्भवण्याचा धोका असतो. वाढलेल्या वजनामुळे घोरणे हा आजार देखील होऊ शकतो. वाढलेल्या वजनामुळे नैराश्य येऊ शकते. त्याचबरोबर वाढलेल्या वजनांमुळे गुडघ्यावर ताण येऊन गुडघेदुखी, कंबर दुखी असे त्रास देखील वाढू शकतात. त्याचबरोबर विविध मानसिक व शारीरिक आजार लठ्ठपणामुळे होतात. त्यामुळे आपली वजन ही नेहमी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
advertisement
लठ्ठपणामुळे महिलांमध्ये देखील वेगवेगळ्या आजार उद्भवतात त्यामध्ये चरबीचे प्रमाण वाढल्याने विशिष्ट असे संप्रेरके श्रवतात यामुळे वंध्यत्व येण्याचा धोका देखील असतो. तसेच बारा वर्षाच्या मुली पासून ते 40 वर्षाच्या महिला पर्यंत होणारा पीसीओडी हा आजार देखील लठ्ठपणामुळे होऊ शकतो. लठ्ठपणा टाळण्यासाठी नियमित 30 ते 40 मिनिटे व्यायाम रोज करणे आवश्यक आहे.
advertisement
त्याचबरोबर हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर फास्ट फूड, जंक फूड खाणे टाळावे. अति साखर असलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. बैठका जर असेल तर अधून मधून हातापायांची हालचाल करावी. आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करून आपण लठ्ठपणावर नक्कीच मात करू शकतो, असं स्थूलता तज्ज्ञ अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
लठ्ठपणाकडे दुर्लक्ष नको! या गंभीर आजारांचे ठरु शकतो कारण, अशी घ्या काळजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement