आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; मधुमेहाच्या रुग्णांना धोका, अशी घ्या काळजी

Last Updated:

Winter Health Care: हिवाळ्यातील थंड हवामानात अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज असते. 

+
आला

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; मधुमेहाच्या रुग्णांना धोका, अशी घ्या काळजी

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्याच्या दिवसांत अनेक आजार डोकं वर काढत असतात. अगदी जुने आजार देखील थंडीत त्रासदायक ठरतात. विशेषत: मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपलं आरोग्य जपावं लागतं. आहार, व्यायाम आणि इतर बाबींची योग्य ती काळजी घ्यावी लागते. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. मयुरा काळे यांनी माहिती दिलीये.
थंडीच्या दिवसांतील आहार
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हिवाळ्यात आहाराची योग्य ती काळजी घ्यावी लागते. साखरेचे पदार्थ टाळलेच पाहिजेत. जेवणात जास्त तेलकट, तुपकट खाणं टाळावं. जास्त कॅलरिजचा आहार घेऊ नये. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. जास्त फायबरयुक्त आहार घ्यावा. थंडीत तहान लागत नाही, तरीही पाणी भरपूर प्यावे. काकडीसारखे पदार्थ आवर्जून खावेत. प्रोटिनयुक्त पदार्थ हिवाळ्यात मिळणारी फळे खाल्ली पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
व्यायाम गरजेचा
हिवाळ्यात थंडीच्या कडाक्यामुळे बऱ्याचदा घराबाहेर जायला नको वाटतं. अशा स्थितीत मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी घरामध्ये बसूनच योगासने आणि प्राणायाम केले पाहिजे. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
advertisement
त्वचेला सांभाळा
हिवळ्यात त्वचा करोडी पडण्याची समस्याना सर्वांनाच जाणवते. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांत याचे प्रमाण अधिक असते. थंडीमुळे पायांना भेगा पडून जखमा देखील होतात. त्यामुळे जखम वाढल्यास मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. शरीराला बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावावे. रात्री झोपताना पायांना तेल लावणंही फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
इतर आजारांकडे दूर्लक्ष नको
मधुमेहाच्या रुग्णांना थंडीत फ्लू म्हणजेच सर्दी, खोकला, ताप असे आजार देखील सतावू शकतात. यावर लवकर लक्ष न दिल्यास न्यूमोनियासारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे यावर योग्य ते उपचार वेळीच घेण्याची गरज असते. तसेच वेळेवर फ्ल्यू विरोधी लस घ्यावी, असे डॉक्टर सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; मधुमेहाच्या रुग्णांना धोका, अशी घ्या काळजी
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement