इंडियन की वेस्टर्न टॉयलेट? पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं कोणतं शौचालय वापरणं चांगलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indian Toilet Vs Western Toilet : अनेकांना स्वच्छता आणि बसण्याच्या दृष्टीने वेस्टर्न टॉयलेट चांगलं वाटतं. पण कोणतं टॉयलेट वापरणं योग्य, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
पुणे : सार्वजनिक ठिकाण असो वा घर भारतातील बहुतेक ठिकाणी इंडियन टॉयलेट होते. आता वेस्टर्न टॉयलेट दिसतील. सार्वजनिक ठिकाणी तर बहुतेक वेस्टर्न टॉयलेटच दिसतील. काही ठिकाणीच दोन्ही टॉयलेट असतील. अनेकांना स्वच्छता आणि बसण्याच्या दृष्टीने वेस्टर्न टॉयलेट चांगलं वाटतं. पण कोणतं टॉयलेट वापरणं योग्य, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
इंडियन टॉयलेट आणि वेस्टर्न टॉयलेट तसे दोघांचेही फायदे तोटे आहेत. पण दोघांमध्ये एक वापरायचा तर कोणता सगळ्यात चांगला आहे? तर याबाबत पुण्याचे डॉ विराज भंडारी यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले,
"जिथं तुम्ही कमोड वापरता तिथं जोर द्यावा लागतो. मग अंबेलिका हरिणिया किंवा पोटातील काही स्नायू फाटून जोर लावल्यामुळे बाहेर येतात आणि त्यामुळे वेगवेगळे आजार होता. पाइल्स, फिशर, फिचूला, भगंधरासारखे आजार होतात. तर इंडियन टॉयलेट वापरलं तर सहजरित्या वेग येईल, जोर द्यावा लागणार नाही. आजूबाजूच्या मसल्सवर ताण येणार नाही"
advertisement
इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेटची स्वच्छता
जर्नल ऑफ एडव्हान्स्ड मेडिकल अँड डेंटल सायन्सेस रिसर्चच्या अहवालानुसार, भारतीय टॉयलेट स्वच्छतेच्या दृष्टीने वेस्टर्न टॉयलेटपेक्षा चांगलं मानलं जातं. भारतीलय टॉयलेट साफ किंवा फ्लश व्हायला जास्त वेळ घेत नाही, तर वेस्टर्न टॉयलेट लवकर खराब होतात आणि फ्लश देखील लगेच होत नाही. सार्वजनिक ठिकाणी भारतीय टॉयलेटचा वापर नेहमीच करावा, कारण त्यामुळे शरीराचा थेट संपर्क टॉयलेट सीटशी येत नाही. हे संपर्क टाळल्यामुळे युरीन इन्फेक्शन (UTI) होण्याचा धोका कमी होतो. वेस्टर्न टॉयलेटमध्ये शरीराचा संपर्क थेट सीटशी येत असल्यामुळे विविध प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो. तसेच, वेस्टर्न टॉयलेटमध्ये पेपर टॉयलेट रोल वापरला जातो, तर भारतीय टॉयलेटमध्ये पाण्याचा वापर होतो, ज्यामुळे भारतीय टॉयलेट अधिक स्वच्छ मानलं जातं.
advertisement
शारीरिक हालचाल
भारतीय टॉयलेटमध्ये बसणे म्हणजे एक प्रकारचा व्यायाम आहे. एखादी व्यक्ती भारतीय शौचालय वापरते तेव्हा तिच्या शरीरात जास्त हालचाल होते. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर दबाव असतो. या पोझिशनमुळे आपल्या पायांच्या स्नायूंना बळ मिळते आणि शरीरात रक्तप्रवाह सुधारतो. भारतीय टॉयलेटमुळे पचनक्रिया सुधारते, कारण या पोझिशनमध्ये बसल्याने आतड्यांवर दबाव येतो आणि मलविसर्जन सोपे होते. संशोधनानुसार, भारतीय टॉयलेट वापरल्याने पोटाच्या समस्या कमी होतात. वेस्टर्न टॉयलेटमध्ये आरामदायी पोझिशन मिळते, ज्यामुळे शरीराच्या हालचाली होत नाहीत.
advertisement
पोट साफ होण्याची प्रक्रिया
भारतीय शौचालय प्रमाणे वेस्टर्न टॉयलेटमध्ये पोट आणि पचनसंस्थेवर दबाव येत नाही. त्यामुले वेस्टर्न टॉयलेट्समुळे अनेक वेळा लोकांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही. स्टडीमध्ये असं समोर आलं आहे की, भारतीय टॉयलेटच्या आसनामुळे पोट साफ करण्यासाठी कमी वेळ म्हणजे 3 ते 4 मिनिटं लागतात, तर वेस्टर्न आसनासाठी 5 ते 7 मिनिटं लागतात. भारतीय टॉयलेटचा वापर बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी चांगला मानला जातो, कारण या पोझिशनमुळे कोलन पूर्णपणे साफ होते.
advertisement
गर्भवती महिलांसाठी कोणतं टॉयलेट फायदेशीर
विशेष म्हणजे गर्भवती महिलांसाठी भारतीय टॉयलेट अधिक फायदेशीर ठरतो, कारण या पोझिशनमध्ये बसल्यामुळे गर्भाशयावर कोणताही दबाव येत नाही, ज्यामुळे नैसर्गिक प्रसूतीस मदत होऊ शकते.
वेस्टर्न टॉयलेटचे देखील फायदे
view commentsत्याचबरोबर वेस्टर्न टॉयलेट वापरण्यात काहीही गैर नाही. ज्यांना गुडघ्याचा किंवा पाठीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी वेस्टर्न टॉयलेट चांगला आहे. वृद्ध व्यक्तींना उठता-बसताना त्रास होतो, त्यामुळे त्यांच्यासाठी वेस्टर्न टॉयलेट अधिक फायदेशीर ठरतो. शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठीही वेस्टर्न टॉयलेट वापरणं सोपं असते. लहान मुलांसाठी देखील वेस्टर्न टॉयलेट अधिक सोयीस्कर ठरते.
Location :
Maharashtra
First Published :
November 19, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
इंडियन की वेस्टर्न टॉयलेट? पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं कोणतं शौचालय वापरणं चांगलं


