advertisement

Khekada Recipe : श्रावण सुरु व्हायला उरले फक्त काही दिवस, गावरान पद्धतीने बनवा खेकड्याचा झणझणीत रस्सा

Last Updated:

श्रावण सुरु व्हायला काहीच दिवस शिल्लक असून त्यापूर्वी मांसाहारावर ताव मारण्याचा अनेकांचा बेत असतो. तेव्हा श्रावण सुरु होण्याआधी तुम्ही खेकड्यांचा झणझणीत रस्सा नक्की करून पाहा.

गावरान पद्धतीने बनवा खेकड्याचा झणझणीत रस्सा
गावरान पद्धतीने बनवा खेकड्याचा झणझणीत रस्सा
पावसाळा हा खेकड्यांच्या सीजन आहे. पावसाळ्यात नदी, खाडी, समुद्र तसेच तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात खेकडे पकडून मासोळी बाजारात विक्रीसाठी आणले जातात. आता श्रावण सुरु व्हायला काहीच दिवस शिल्लक असून त्यापूर्वी मांसाहारावर ताव मारण्याचा अनेकांचा बेत असतो. तेव्हा श्रावण सुरु होण्याआधी तुम्ही खेकड्यांचा झणझणीत रस्सा नक्की करून पाहा.
खेकडा रस्सा करण्यासाठी साहित्य :
7 खेकडे
2 कांदे
1 वाटी सुके खोबरे
4-5 लवंग काळीमिरी
4-5 लसूण पाकळ्या
1 टीस्पून खसखस
1 टोमॅटो
1 इंच आल्याचा तुकडा
3 चमचे तेल
मीठ चवीनुसार
2 चमचे धने पावडर
1-2 चमचा हळद
खेकडा रस्सा रेसिपीची कृती :
सर्व प्रथम खेकडे नीट स्वच्छ करून घ्या. युट्यूबवर खेकडे साफ कसे करायचे याबाबत अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. खेकड्याच्या रस्सा बनवण्यासाठी तुम्ही त्याचे वाटण तयार करा. वाटणाकरीता कांदा खोबरं छान खरपूस भाजून घ्या त्या सोबत खसखस, लवंग, दालचिनी, काळीमिरी, लसूण भाजुन, घ्यावे. अशा प्रकारे वाटण तयार होईल. खेडकड्याचे छोटे नांगे मिस्करमधून वाटून घ्यावेत.
advertisement
रस्सा तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल तापवून घ्या. तेल तापलं की त्यात वाटण टाकून चांगले परतवून घ्या. मग त्यात लाल मसाला, हळद, धणे पावडर चांगलं परतवून घ्या. वाटण नीट परतवून घ्या आणि मग त्यात तुम्हाला केवढा रस्सा हवा तेवढे पाणी ओता. उकळी आल्यावर त्यात स्वच्छ केलेली खेकडी टाका. चवीनुसार मीठ टाका अशा प्रकारे खेकडा रस्सा तयार होतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Khekada Recipe : श्रावण सुरु व्हायला उरले फक्त काही दिवस, गावरान पद्धतीने बनवा खेकड्याचा झणझणीत रस्सा
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement