advertisement

Milk And Acne : दूध प्यायल्याने खरंच चेहऱ्यावरचे पिंपल्स वाढतात का? पिंपल्स होण्याची नेमकी कारणं कोणती?

Last Updated:

Does dairy products cause pimples : आधीच पिंपल्सची प्रवृत्ती असलेल्या लोकांमध्ये दूध आणि काही डेअरी पदार्थ मुरुमांची समस्या वाढवू शकतात. अनेक लोकांसाठी डेअरी पिंपल्सचा ट्रिगर ठरू शकते, मात्र याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे होतो.

प्रत्येक डेअरी प्रोडक्टमुळे पिंपल्स होतात का?
प्रत्येक डेअरी प्रोडक्टमुळे पिंपल्स होतात का?
मुंबई : दूध आणि त्वचेच्या समस्या, विशेषतः पिंपल्स (Acne) यांचा संबंध आहे का, हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. काही लोकांना दूध किंवा डेअरी पदार्थ खाल्ल्यानंतर त्वचेवर पिंपल्स वाढल्याचे लक्षात येते, तर काहींना कोणताही त्रास होत नाही. तज्ज्ञांच्या मते, डेअरी प्रत्येकासाठी वाईटच असते असे नाही, पण अनेक लोकांमध्ये ती एक ट्रिगर म्हणून काम करू शकते.
याचा अर्थ असा की, आधीच पिंपल्सची प्रवृत्ती असलेल्या लोकांमध्ये दूध आणि काही डेअरी पदार्थ मुरुमांची समस्या वाढवू शकतात. अनेक लोकांसाठी डेअरी पिंपल्सचा ट्रिगर ठरू शकते, मात्र याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. यामागे मुख्यतः तीन कारणे मानली जातात.
दुधामुळे पिंपल्स होण्याची करणे
इन्सुलिन स्पाइक : डेअरी पदार्थ, विशेषतः स्किम्ड मिल्क, शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवतात. स्किम्ड मिल्क अनेकदा हेल्दी मानले जाते, पण ते शरीरात हार्मोनल बदल घडवून आणते, ज्यामुळे सेबम म्हणजेच तेल वाढू शकते आणि परिणामी पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.
advertisement
इन्फ्लेमेशन : डेअरी पदार्थ शरीरात सिस्टमिक इन्फ्लेमेशन वाढवू शकतात. पिंपल्स ही मुळात त्वचेची सूजजन्य समस्या असल्याने, शरीरात सूज वाढली की चेहऱ्यावर लाल, वेदनादायक मुरुम होण्याची शक्यता अधिक वाढते.
हार्मोनल प्रभाव : दुधामध्ये नैसर्गिकरित्या काही हार्मोन्स असतात, जे त्वचेतील तेलग्रंथींवर परिणाम करू शकतात. त्यामुळे पोअर्स ब्लॉक होऊन पिंपल्स वाढू शकतात.
प्रत्येक डेअरी प्रोडक्टमुळे पिंपल्स होतात का?
संशोधक अजूनही आहाराचा पिंपल्सवर नेमका कसा परिणाम होतो याचा अभ्यास करत आहेत. मात्र, हे स्पष्ट झाले आहे की, आहारामुळे पिंपल्सची तीव्रता नक्कीच बदलू शकते. एकही विशिष्ट अन्नपदार्थ थेट पिंपल्स निर्माण करतो असे नाही, पण काही पदार्थ पिंपल्स अधिक बिघडवू शकतात आणि त्यात डेअरीचा समावेश होतो.
advertisement
2019 मधील एका मेटा-अनालिसिसनुसार, एकूण डेअरी सेवन आणि दूध सेवन यांचा पिंपल्सच्या समस्येशी संबंध आढळून आला. विशेष म्हणजे, दूध फुल फॅट असो किंवा लो फॅट, दोन्ही प्रकारांमध्ये हा धोका दिसून आला. त्या अभ्यासात दही आणि चीजचा थेट संबंध आढळला नव्हता.
त्वचेवर वेगवेगळ्या डेअरी पदार्थांचा होतो वेगवेगळा परिणाम
दूध : सर्वाधिक समस्या दूध प्यायल्यामुळे दिसून येते. विशेषतः स्किम्ड मिल्कचा संबंध पिंपल्स वाढण्याशी अधिक जोडला जातो.
advertisement
पनीर आणि आइसक्रीम : यामध्ये साखर आणि फॅटचे प्रमाण जास्त असते, जे त्वचेतील सूज वाढवून मुरुमांची समस्या अधिक बिघडवू शकते.
दही आणि प्रोबायोटिक्स : रंजक बाब म्हणजे दही आणि ताक अनेकदा त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. यामधील चांगले बॅक्टेरिया पचन सुधारतात आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात, ज्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर दिसू शकतो.
advertisement
तुम्हाला वारंवार पिंपल्सचा त्रास होत असेल आणि दूध किंवा डेअरी पदार्थ खाल्ल्यानंतर समस्या वाढत असल्याचे जाणवत असेल तर काही काळ डेअरी कमी करून त्वचेतील बदल निरीक्षण करणे उपयुक्त ठरू शकते. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने कोणताही मोठा आहार बदल करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Milk And Acne : दूध प्यायल्याने खरंच चेहऱ्यावरचे पिंपल्स वाढतात का? पिंपल्स होण्याची नेमकी कारणं कोणती?
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement