एक मिनिटाचं मौन, हाताला काळी पट्टी, भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय क्रिकेटपटूंनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मॅचआधी खेळाडूंनी एक मिनीट मौन पाळून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आयएस बिंद्रा यांना श्रद्धांजली वाहिली. रणजी ट्रॉफीच्या सातव्या राऊंडचे सामने 29 जानेवारीपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू झाले आहेत, त्याआधी चंडीगढ आणि मुंबईच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी सामन्याआधी एक मिनिट मौन बाळगून अजित पवार आणि आयएस बिंद्रा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अजित पवार यांचं बुधवारी सकाळी विमान अपघातामध्ये निधन झालं. मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान कोसळलं, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. तर आयएस बिंद्रा यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिंद्रा 1993 ते 1996 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. मोहालीमध्ये आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये पंजाब आणि कर्नाटकचे खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी बिंद्रा यांना श्रद्धांजली वाहिली. पंजाब आणि कर्नाटक यांच्यात एलीट ग्रुप बी चा सामना सुरू आहे.
advertisement
A moment of silence was observed before the Ranji Trophy match between Mumbai and Delhi to pay tribute to the late Hon. Deputy Chief Minister Shri Ajit Dada Pawar, honouring his memory and contributions. A moment of silence was observed before the Ranji Trophy match between… pic.twitter.com/DAOoeh6YA4
— Ajinkya Naik - President, MCA. (@ajinkyasnaik) January 29, 2026
advertisement
दुसरीकडे मुंबईच्या बीकेसी मैदानात मुंबई आणि दिल्लीच्या खेळाडूंनी अजितदादांना एक मिनिटाचं मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली. याशिवाय खेळाडूंनी हाताला काळी पट्टीही बांधली आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये बीकेसी मैदानात एलीट ग्रुप डी चा सामना सुरू झाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर लिहिलं, 'दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना एक मिनिटाचं मौन बाळगण्यात आलं, त्यांच्या स्मृतींना आणि योगदानाचा सन्मान'.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 4:27 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
एक मिनिटाचं मौन, हाताला काळी पट्टी, भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली









