advertisement

Health Tips : 10 दिवसात दूर पळतील सर्व आजार, 3 पदार्थांच्या सेवनाने पूर्ण बॉडी होईल डिटॉक्स

Last Updated:

अनेक कारणांमुळे शरीरात विषाक्त पदार्थ जमा होतात. या पदार्थांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी शरीर डिटॉक्स करणे गरजेचे असते.

10 दिवसात दूर पळतील सर्व आजार, 3 पदार्थांच्या सेवनाने पूर्ण बॉडी होईल डिटॉक्स
10 दिवसात दूर पळतील सर्व आजार, 3 पदार्थांच्या सेवनाने पूर्ण बॉडी होईल डिटॉक्स
बदललेली लाईफस्टाईल, प्रदूषित वातावरण, पौष्टिक आहाराचा अभाव इत्यादी अनेक कारणांमुळे शरीरात  विषाक्त पदार्थ जमा होतात. या पदार्थांना शरीरातून बाहेर काढण्यासाठी शरीर डिटॉक्स करणे गरजेचे असते. शरीर डिटॉक्स झाल्याने व्यक्ती निरोगी राहतो आणि त्याची पचनक्रिया देखील चांगल्या प्रकारे होते. तसेच शरीरात नवी ऊर्जा संचारते आणि मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहते. तुम्ही काही भाज्यांचा वापर करून तुमचे शरीर डिटॉक्स करू शकता.
दुधी डिटॉक्ससाठी बेस्ट :
दुधीमध्ये फायबरचे भरपूर प्रमाण असून यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. दुधीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि पाण्याची मात्रा अधिक असते त्यामुळे दुधी ही वजन कमी करण्यासाठी उत्तम भाजी आहे. याचे सेवन केल्याने बराचकाळ पोट भरलेले राहते. दुधीमुळे ब्लड शुगर देखील कंट्रोलमध्ये राहते. दुधीचा ज्यूस आतडे आणि मूत्राशय साफ करते. परंतु दुधीची भाजी करताना किंवा ज्यूस करताना दुधी कडू तर नाही ना हे तपासून पाहा. कडू दुधीचा ज्यूस पिऊ नका.
advertisement
शेवग्याच्या शेंगा :
शेवग्याच्या शेंगांना आयुर्वेदात सुपरफूड मानले जाते. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असते. याचे नियमित सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. तसेच यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा उपयोगी ठरतात.
advertisement
आलं :
ताज आलं आरोग्यासाठी गुणकारी ठरतं. याला आयुर्वेदात देखील खूप महत्व आहे. आल्याचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, घश्यात खवखव, बद्धकोष्ठता इत्यादींपासून आराम मिळतो. तसेच आलं अस्थमा आणि श्वासाशी संबंधित आजारावर परिणामकारक ठरते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : 10 दिवसात दूर पळतील सर्व आजार, 3 पदार्थांच्या सेवनाने पूर्ण बॉडी होईल डिटॉक्स
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement