advertisement

Poha Vs Murmure : वजन कमी करायचंय, नाश्त्यात पोहे खाणं योग्य की मुरमुरे? पाहा कॅलरी आणि पोषणाचं अचुक गणित

Last Updated:

Poha Vs Murmure For Weight Loss : भारताच्या प्रत्येक भागात आवडीने खाल्ले जाणारे हे दोन्ही पदार्थ केवळ चविष्टच नाहीत तर बनवायलाही अतिशय सोपे आहेत. पण आरोग्याचा विचार करता, या दोघांपैकी नेमके काय निवडावे? हे काहीवेळा कळत नाही.

वेट लॉससाठी कोणते अधिक चांगले?
वेट लॉससाठी कोणते अधिक चांगले?
मुंबई : तांदूळ हा जगभरातील मुख्य आहार आहे, पण आजकाल फिटनेसप्रेमी त्याला ‘बॅड कार्ब्स’च्या श्रेणीत टाकू लागले आहेत. मात्र हेल्थ एक्स्पर्ट्स तांदळाच्याच दोन खास प्रकारांना म्हणजेच पोहे आणि मुरमुरे यांना आरोग्यासाठी वरदान मानतात. भारताच्या प्रत्येक भागात आवडीने खाल्ले जाणारे हे दोन्ही पदार्थ केवळ चविष्टच नाहीत तर बनवायलाही अतिशय सोपे आहेत. पण आरोग्याचा विचार करता, या दोघांपैकी नेमके काय निवडावे? हे काहीवेळा कळत नाही. चला तर मग आज याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कॅलरी आणि पोषणातील फरक..
बहुतेक लोकांना वाटते की, मुरमुरे हलके असतात, त्यामुळे त्यात कॅलरी कमी असतील. पण आकडे काही वेगळेच सांगतात. टीओआयच्या माहितीनुसार, 100 ग्रॅम तांदळात जिथे 130 कॅलरी असतात, तिथे 100 ग्रॅम मुरमुऱ्यामध्ये सुमारे 402 कॅलरी आढळतात. याउलट 100 ग्रॅम पोह्यांमध्ये केवळ 110 कॅलरी असतात.
हा फरक त्यांच्या बनवण्याच्या पद्धतीमुळे दिसून येतो. पोहे, तांदूळ दाबून तयार केले जातात, त्यामुळे त्यातील पोषक घटक आणि फायबर सुरक्षित राहतात. तर मुरमुरे उच्च तापमानावर भाजले जातात, त्यामुळे ते हलके होतात पण त्यांची कॅलरी डेन्सिटी वाढते.
advertisement
वेट लॉससाठी कोणते अधिक चांगले?
जर तुमचे लक्ष्य वजन कमी करणे असेल, तर पोहे तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय ठरतात. पोह्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन सुधारते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. दुसरीकडे, मुरमुरे ‘लाइट स्नॅकिंग’साठी योग्य असतात, पण त्यातील फायबरचे प्रमाण पोह्यांच्या तुलनेत कमी असते.
महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे..
advertisement
शुगर असलेल्या रुग्णांसाठी पोहे किंवा मुरमुरे सुरक्षित आहेत का?
- पोह्यांचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ तांदळापेक्षा कमी असतो, त्यामुळे शुगर असलेल्या रुग्णांसाठी ते चांगला पर्याय ठरतात. त्यात भरपूर भाज्या घातल्या तर ते आणखी पौष्टिक बनतात. मुरमुरेही खाता येतात, पण प्रमाणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
पोहे खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते का?
- होय! पोहे बनवताना ते लोखंडी रोलर्समधून जातात, त्यामुळे त्यातील आयर्न चे प्रमाण वाढते. गर्भवती महिला आणि मुलांसाठी पोहे आयर्नचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र महिलांनी सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
मुरमुरे खाण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?
- मुरमुरे पचायला अतिशय हलके असतात, त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ते सर्वात योग्य ठरतात. ते पोटावर जड पडत नाहीत आणि लगेच ऊर्जा देतात.
हे रोज खाणे सुरक्षित आहे का?
- नक्कीच. पोहे आणि मुरमुरे दोन्ही ग्लूटेन-फ्री आहेत. हे रोजच्या नाश्त्यात समाविष्ट करता येतात, फक्त बनवताना तेलाचा वापर कमीत कमी असावा याची काळजी घ्या.
advertisement
कॅलरी आणि पोषणातील फरक..
कॅलरी आणि पोषणातील फरक..
पोहे अधिक हेल्दी कसे बनवावेत?
- पोह्यांना फक्त कार्बोहायड्रेट्सपुरते मर्यादित ठेवू नका. त्यात शेंगदाणे, मटार, गाजर आणि बीन्स घालून ते प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध करा. वरून लिंबाचा रस नक्की पिळा, कारण व्हिटॅमिन C आयर्नच्या शोषणास मदत करते.
advertisement
थोडक्यात सांगायचे तर, पोहे आणि मुरमुरे दोन्हीही मिनरल्स, व्हिटॅमिन C आणि A ने भरपूर आहेत. जिथे मुरमुरे झटपट तयार होणारा हलका स्नॅक आहेत, तिथे पोहे एक संपूर्ण आणि पोषणमूल्यांनी भरलेला नाश्ता आहेत. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर पोहे हीच तुमची पहिली पसंती असायला हवी.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Poha Vs Murmure : वजन कमी करायचंय, नाश्त्यात पोहे खाणं योग्य की मुरमुरे? पाहा कॅलरी आणि पोषणाचं अचुक गणित
Next Article
advertisement
Ajit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्लीत कोणाला संधी?
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्ल
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आ

  • अजितदादांनी अकाली घेतलेल्या एक्झिटने राज्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजक

  • अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राजकीय जागांवर आता पवार कुटुंबातील

View All
advertisement