'काजू' फसवणुकीचा पुण्यात नवा पॅटर्न! काजूच्या नादात क्षणात 6 लाखांचा गंडा; तुम्हीही ही चूक करताय का?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपींनी एका नामांकित कंपनीच्या बनावट नावाने त्यांच्याशी संपर्क साधला आणि तब्बल ६५० किलो काजूची मोठी ऑर्डर दिली. एवढी मोठी ऑर्डर मिळाल्याने व्यावसायिकाचा त्यांच्यावर विश्वास बसला.
पुणे : काजूच्या मोठ्या ऑर्डरचे आमिष दाखवून एका फळ विक्रेत्यासोबत धक्कादायक कांड घडलं आहे. विक्रेत्याला सहा लाख रुपयांहून अधिक रकमेचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे सौदागर परिसरात उघडकीस आला आहे. मोबाईल हॅक करून आणि बनावट 'पेमेंट स्क्रीनशॉट'चा वापर करून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट ऑर्डर अन् विश्वास संपादन
मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तक्रारदार हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपींनी एका नामांकित कंपनीच्या बनावट नावाने त्यांच्याशी संपर्क साधला आणि तब्बल ६५० किलो काजूची मोठी ऑर्डर दिली. एवढी मोठी ऑर्डर मिळाल्याने व्यावसायिकाचा त्यांच्यावर विश्वास बसला.
advertisement
असा रचला फसवणुकीचा सापळा
व्यवहार ठरल्यानंतर, आरोपींनी पैसे NEFT द्वारे पाठवल्याचा एक बनावट स्क्रीनशॉट व्यावसायिकाला पाठवला. प्रत्यक्षात खात्यावर एक रुपयाही जमा झाला नव्हता, मात्र स्क्रीनशॉट खरा असल्याचे भासवून चोरट्यांनी व्यावसायिकाचा मोबाईल हॅक केला. यामुळे खात्यातील व्यवहारांची नेमकी माहिती मिळण्यापूर्वीच आरोपींनी ६ लाख ६८ हजार ५८९ रुपये किमतीचा काजूचा साठा परस्पर लंपास केला.
advertisement
पोलीस तपास सुरू
आपल्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत आणि आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच फळ विक्रेत्याने पोलिसांत धाव घेतली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 12:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'काजू' फसवणुकीचा पुण्यात नवा पॅटर्न! काजूच्या नादात क्षणात 6 लाखांचा गंडा; तुम्हीही ही चूक करताय का?









