Railway Update: मुंबईतून अजमेर दर्शनाला जाताय? पश्चिम रेल्वेचं खास गिफ्ट, लगेच करा तिकीट बूक!
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway Update: पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. अजमेर दर्शन आता सोप्पं होणार आहे.
मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि सतत वाढणारी प्रवासाची मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. वांद्रे टर्मिनसहून राजस्थानकडे धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या विशेष एक्स्प्रेस गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि राजस्थानदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09622 वांद्रे टर्मिनस ते अजमेर एक्स्प्रेस ही विशेष गाडी आता 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत धावणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या दिशेने धावणारी गाडी क्रमांक 09621 अजमेर ते वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
advertisement
याशिवाय, वांद्रे टर्मिनस ते राजस्थानमधील भगत की कोठी दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक 04828 वांद्रे टर्मिनस ते भगत की कोठी एक्स्प्रेस ही गाडी 1 मार्च 2026 पर्यंत धावेल, तर परतीची गाडी क्रमांक 04827 भगत की कोठी ते वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ही 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत धावणार आहे.
advertisement
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ
गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक, थांबे, प्रवासाचा कालावधी तसेच अन्य माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.enquiry.indianrail.gov.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 12:12 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Update: मुंबईतून अजमेर दर्शनाला जाताय? पश्चिम रेल्वेचं खास गिफ्ट, लगेच करा तिकीट बूक!








