बांगलादेशनंतर आणखी एका देशाचा T20 World Cup खेळण्यास नकार, पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Iceland refuse to play in t20 world cup 2026 : आईसलँड या देशाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे. आईसलँड देश टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या रेसमध्येच नव्हता.
T20 World Cup 2026 Update : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला (T20 World Cup 2026) आता फक्त हातावर मोडण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 7 तारखेपासून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होणार आहे. अशातच आता बांगलादेशच्या निर्णयाने आयसीसीची मोठी कोंडी झाली होती. बांगलादेशने भारतात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिल्याने आता स्कॉटलँडला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली आहे. अशातच आता आणखी एका टीमने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा भाग बनवला अन्
आईसलँड या देशाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे. आईसलँड देश टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या रेसमध्येच नव्हता. तरी देखील मजेशीर पद्धतीने आणि हास्यास्पद भाषेचा वापर करत आईसलँडने स्वत:ला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा भाग बनवला अन् मजेशीर पोस्ट केली.
पाकिस्तानच्या जागी खेळणं शक्य नाही
advertisement
आम्ही जड अंतःकरणाने जाहीर करत आहोत की, आगामी T20 World Cup मध्ये पाकिस्तानच्या जागी खेळणं आम्हाला शक्य होणार नाही. आता त्यांनी माघार घेतली तरी, कमी वेळेमुळे या जागतिक क्रिकेट स्पर्धेत प्रभावीपणे स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक पद्धतीने तयारी करणं आमच्या संघासाठी अशक्य आहे. आम्ही स्कॉटलंडसारखे नाही की, कोणत्याही किट प्रायोजकाशिवाय, ऐनवेळी मैदानात उतरू, असं म्हणत आईसलँडने आयसीसीची खिल्ली उडवली आहे.
advertisement
Dear @ICC,
It is with a heavy heart that we now announce our unavailability to replace Pakistan in the upcoming T20 World Cup. Regardless of whether they now withdraw, the short timescales ensure it is impossible for our squad to prepare in the professional manner necessary to…
— Iceland Cricket (@icelandcricket) January 29, 2026
advertisement
आमचा कर्णधार, एक व्यावसायिक बेकर
आमचे खेळाडू विविध क्षेत्रांतील आहेत आणि ते फक्त जगाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन, केवळ फिनलंडच्या सौनामध्ये जाणवणारं तापमान अनुभवण्यासाठी आपला व्यवसाय सोडून जाऊ शकत नाहीत. आमचा कर्णधार, जो एक व्यावसायिक बेकर आहे, त्याला त्याच्या ओव्हनकडे लक्ष द्यावं लागतं, आमच्या जहाजाच्या कॅप्टनला त्याचे जहाज चालवावं लागतं आणि आमच्या बँकर्सना दिवाळखोर व्हावं लागतं (पुन्हा). हौशी स्तरावरील क्रिकेटचे हेच कटू वास्तव आहे, अशी मजेशीर पोस्ट आईसलँडने केली आहे.
advertisement
युगांडाचा फायदा होईल
दरम्यान, आमच्या नुकसानीमुळे कदाचित युगांडाचा फायदा होईल. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांची किट इतकी लक्षवेधी आहेत की, तुम्हाला अपस्मारचा आजार नसेल तरच ती पाहता येतील, अन्यथा ती न पाहणेच उत्तम, असं आईसलँडने क्रिकेटने पोस्ट करत म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 11:54 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बांगलादेशनंतर आणखी एका देशाचा T20 World Cup खेळण्यास नकार, पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला!








