मुलं केळी आणि ड्रायफ्रूट खाण्यास कंटाळा करतात? 5 मिनिटांत बनवा हेल्दी शेक Video

Last Updated:

अनेकदा लहान मुलं केळी किंवा ड्रायफूट्स खाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे ड्रायफूट्स शेक तुम्ही 5 मिनिटांत बनवून देऊ शकता.

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
चंद्रपूर : हेल्दी पदार्थांचे सेवन निरोगी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. मात्र, अनेकदा लहान मुलं केळी किंवा ड्रायफूट्स खाण्यास कंटाळा करतात. वयोवृद्धांना देखील ड्रायफूट्स चावून खाणे शक्य होत नाही. त्यामुळे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असलेला हेल्दी बनाना ड्रायफूट्स शेक अगदी 5 मिनिटांत कसा बनवाल? याबद्दच चंद्रपूर येथील आशिष काळे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
ड्रायफूट्स शेकसाठी लागणारे साहित्य 
अर्धा वाटी भिजवलेले बदाम, अर्धी वाटी भिजवलेले अंजीर, अर्धी वाटी भिजवलेले अक्रोड, अर्धी वाटी खजूर, अर्धी वाटी गूळ, 2 ग्लास गाईचं दूध, 2 केळी आणि हवे असल्यास फुटाणे तुम्ही घेऊ शकतात.
advertisement
हेल्दी शेक बनविण्यासाठी कृती 
सर्वप्रथम सकाळी शेक करायचा असल्यास ड्रायफूट्स रात्री भिजत घालावे. त्यानंतर आधी खजुर मिक्सरमधून काढून घ्या. आता बदाम, अंजीर, अक्रोड, बारीक करून घ्या. आता त्यात केळी कुस्करून अ‍ॅड करा. त्यानंतर चवीनुसार साखर किंवा गूळ अ‍ॅड करा. आता दूध अ‍ॅड करून परत एकदामिक्सर मधून फिरवून घ्या. हे साहित्य 4-5 व्यक्तींना पुरेल इतकं आहे. तुम्ही आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. आता हा हेल्दी ड्रायफूट्स शेक पिण्यासाठी तयार आहे. या शेकमध्ये तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट वापरू शकता, असं आशिष काळे सांगतात.
advertisement
दररोज मुलांना टिफिनमध्ये काय नवीन द्यावं? झटपट तयार होणारी 'ही' रेसिपी पाहा
तर अशाप्रकारे या शेकमध्ये केळी आणि ड्रायफूट्स तसेच गाईचं दूध वापरून शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. कोणीही सहज 5 मिनिटांत हा शेक बनवू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
मुलं केळी आणि ड्रायफ्रूट खाण्यास कंटाळा करतात? 5 मिनिटांत बनवा हेल्दी शेक Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement