आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या बीटाचा पराठा कसा बनवाल? पाहा रेसिपी
- Published by:News18 Marathi
- local18
- Written by:News18 Marathi
Last Updated:
बिटापासून वेगवेगळे टेस्टी पदार्थ बनवून हे फळ खाऊ शकतो. आज आपण बिटाचे पराठे कसे बनवायचे हे पाहणार आहोत.
वर्धा, 20 सप्टेंबर : फळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बीट हे फळ सुद्धा आरोग्यासाठी लाभदायक आहे. शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास बीट फळ मदत करते. बीट फळ हृदयरोगासाठी चांगलं असल्याचं सांगितलं जातं. मात्र या फळाची चव अनेकांना आवडत नाही. त्यामुळे बिटापासून वेगवेगळे टेस्टी पदार्थ बनवून हे फळ खाऊ शकतो. बिटापासून पकोडे, सॅलेड, पराठे, अप्पे यासारखे पदार्थ बनवतात. आज आपण बिटाचे पराठे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. वर्धा येथील गृहिणी विद्या धामंदे यांनी अगदी झटपट होणारी बिटाच्या पराठ्यांची रेसिपी सांगितली आहे.
बीट हे भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. रोज याचे सेवन केल्याने या दोन्हींचे आवश्यक प्रमाण तुमच्या शरिरामध्ये संतुलित राहते. बिटामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी 9 आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळते. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो, असं जाणकार सांगतात. नियमित आहारात बिटाचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.
advertisement
नागपूरकरांची नाश्त्याची फेमस जागा, रोज होतात 500 प्लेट फस्त
बीट कच्चं खाणे पसंत न करणाऱ्यांसाठी बिटाचे पराठे हा एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी किसलेले दोन बीट आणि गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ गरज वाटल्यास बेसन, हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ आणि तेल या साहित्याने तुम्ही झटपट आणि कुरकुरीत बिटाचे पराठे बनवून खाऊ शकता. घरातील चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत हे कुरकुरीत पराठे आवडीने खाल्ले जातात. मुलांना शाळेत डब्ब्यासाठीही हे हेल्दी पराठे देऊ शकता.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 20, 2023 7:02 PM IST