फावल्या वेळात घरीच बनवा मसाले शेंगदाणे, पाहा सोपी रेसिपी
- Published by:Mohan Najan
Last Updated:
घरगुती पदार्थ नेहमीच सर्वांना आवडतात. त्यामुळं या पद्धतीनं मसाला शेंगदाणे घरीच बनवू शकता.
वर्धा, 16 सप्टेंबर : सण-उत्सवाचा काळ आता सुरु झाला आहे. सणांची गंमत ही खाण्यापिण्यातही असते. मिठाई खाताना लोकांना कंटाळा येतो. अशा परिस्थितीत सण-उत्सवांमध्ये खारट, तिखट पदार्थांना मोठी मागणी असते. घरगुती पदार्थ नेहमीच सर्वांना आवडतात. मसाला शेंगदाणे, खारे शेंगदाणे हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडतात. त्यामुळं मसाला शेंगदाणे देखील घरीच बनवू शकता. बनवायला सोपी आणि खायलाही खूप चविष्ट अशी रेसिपी कशी बनवायची हे वर्धा येथील कुमुदी गायकवाड यांनी सांगितलं आहे.
मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी घरातीलच साहित्य लागतं. कच्चे शेंगदाणे, बेसन, कॉर्नफ्लोअर किंवा तांदूळचं पीठ, काळे मीठ, थोडं साधं मीठ, तळण्यासाठी तेल, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, हळद, धने पावडर, हिंग आणि चाट मसाला हे साहित्य प्रत्येक घरात असतंच. यापासूनच मसाला शेंगदाणे सोप्या पद्धतीनं बनवता येतात.
73 वर्षांपासून पुण्यात नंबर 1 आहे ‘ही’ मिसळ, पाहा काय आहे खासियत
सर्वप्रथम कच्चे शेंगदाणे पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्या. नंतर थोडा वेळ बाजूला ठेवा. एका वाट्यात बेसन, कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ घ्या. यामध्ये धनेपूड, हळद, लाल मिरची पावडर , जिरे पूड, मीठ, हिंग हे मसाले ऍड करा. तुम्हाला आंबट हवं असेल तर तुम्ही यात थोडे लिंबू देखील टाकू शकत. या मिश्रणात शेंगदाणे चांगले एकत्र करून घ्या. नंतर थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. शेंगदाणे या पिठामध्ये चांगले कोट झाले की त्यानंतर मंद ते मध्यम आचेवर तळून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा.
advertisement
पावसाळ्यातच येते ही खास भाजी, तुम्ही कधी रेसिपी ट्राय केली का? PHOTOS
तेलातून बाहेर काढून घेतल्यानंतर त्यावर चाट मसाला, मीठ, तिखट, आमचूर पावडर टाका. हे सगळं एकत्र करून घ्या. जेणेकरून या मसाल्यांची चव सर्व शेंगदाण्याला येईल. जर तुमच्याकडे फावला वेळ असेल आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर हे मसालेदार खुसखुशीत आणि चविष्ट शेंगदाणे अगदी दहा मिनिटात तयार होतील.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 16, 2023 10:31 PM IST