Rose Day 2024 : प्रेमासाठी लाल, तर मैत्रीसाठी पिवळा; गुलाबाच्या प्रत्येक रंगामागचा अर्थ माहितीये का?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
तुम्हाला माहिती आहे का की, पिवळा, केशरी आणि गुलाबी गुलाब कोणाला दिला जाऊ शकतो, आणि त्याचा अर्थ काय आहे? प्रत्येक रंगाच्या गुलाबाचा भावनात्मक अर्थ जाणून घेऊ या, जेणेकरून तुम्ही योग्य व्यक्तीला योग्य रंगाच्या गुलाबाचं फूल देऊ शकाल.
मुंबई : फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात व्हॅलेंटाइन डे साजरा होत असतो. तसंच त्याच्या एक आठवडा आधीपासूनच व्हॅलेंटाइन वीक सुरू होतो. त्यात प्रत्येक दिवसच खास असतो. पहिला दिवस अर्थात 7 फेब्रुवारी हा दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जातो. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे. अशातच प्रेमाचा हा आठवडा गुलाबाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब देणं हा सगळ्यांसाठीच आवडता पर्याय आहे. याखेरीज इतर अनेक भावना या गुलाबाद्वारेच व्यक्त केल्या जात असतात. वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनातली भावना अगदी सहजपणे सांगू शकता. बहुतांश जणांना माहिती असेलच, की लाल रंगाचा गुलाब हे प्रेम व्यक्त करण्याचं प्रतीक मानलं जातं; पण तुम्हाला माहिती आहे का की, पिवळा, केशरी आणि गुलाबी गुलाब कोणाला दिला जाऊ शकतो, आणि त्याचा अर्थ काय आहे? प्रत्येक रंगाच्या गुलाबाचा भावनात्मक अर्थ जाणून घेऊ या, जेणेकरून तुम्ही योग्य व्यक्तीला योग्य रंगाच्या गुलाबाचं फूल देऊ शकाल. 'टाइम्स नाऊ नवभारत'ने या संदर्भात माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
लाल गुलाब
लाल गुलाबाबद्दल फार काही सांगायची गरज नाही. लाल गुलाबाचा अर्थ आहे आय लव्ह यू. हा गुलाब प्रेम, नात्यातलं सौंदर्य आणि एकमेकांशी असलेलं नातं यांच्याबद्दलचा सन्मान प्रतीत करणाऱ्या आणि प्रेमभावना व्यक्त करत असतो. त्यामुळेच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब हा सर्वांत योग्य पर्याय मानला जातो.
advertisement
पांढरा गुलाब
तुमच्या मनात कधी कोणाबद्दल प्रेम ही भावना मनात नुकतीच निर्माण झाली आहे का? किंवा रिलेशनशिपची नुकतीच सुरुवात वगैरे झाली आहे असं काही आहे का? तसं असेल तर, प्रेम ही भावना वाटणारं, मनात असणारं आकर्षण व्यक्त करण्यासाठी पांढरा गुलाब परफेक्ट आहे. हा गुलाब प्रेमाची भाषा व्यक्त करतो आणि समोरच्या व्यक्तीला याची जाणीव करून देतो, की तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीची निवड केली आहेत.
advertisement
गुलाबी गुलाब
तुम्हाला आयुष्यात तुमचं प्रेम मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला आहे, किंवा या प्रेमाबद्दल तुम्ही किती भाग्यवान आहात हे जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल किंवा समोरच्या व्यक्तीची काळजी घेणं, प्रेम करणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे दाखवून द्यायचं असेल तर हा गुलाबी गुलाब तुम्ही द्यायला हवा. हा गुलाब आनंद, नात्यातलं सौंदर्य आणि समोरच्या व्यक्तिप्रति आभार व्यक्त करतो.
advertisement
पिवळा गुलाब
मैत्रीचं नातं आणि त्या व्यक्तिप्रति तुमचं असलेलं मैत्र भावनेतलं प्रेम, स्नेह दाखविण्यासाठी पिवळा गुलाब उत्तम आहे. या रंगाचा गुलाब फक्त मित्र-मैत्रिणींनाच नव्हे तर तुमची पत्नी, गर्लफ्रेंड यांनासुद्धा देऊ शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा हे समजेल की तुम्ही त्यांच्यावर फक्त प्रेमच करत नाही तर त्यांच्या आयुष्यातले एक उत्तम मित्र आहात.
केशरी गुलाब
एकमेकांबद्दल असलेली उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केशरी गुलाब दिला जातो. दोघांनाही जर परस्परांबद्दल आकर्षण वाटत असेल आणि एकमेकांच्या आयुष्यात काही खास जागा निर्माण करायची असेल तर हा केशरी गुलाब देऊन नात्याबद्दल थोडा गांभीर्याने विचार करण्यासाठी योग्य निवड आहे.
advertisement
निळा गुलाब
एखादी व्यक्ती तुमच्यासाठी किती खास आहे, हे दाखविण्यासाठी निळ्या रंगाचा गुलाब दिला जातो. कारण, निळ्या रंगाचा गुलाब खूप क्वचित आढळतो. त्यामुळं याचं महत्त्व खूप खास आहे. तुमच्या आयुष्यात अनेक माणसं असतील मात्र ती एकच व्यक्ती अशी असेल, जी तुमच्यासाठी खूपच खास आहे. त्यामुळे गर्लफ्रेंड किंवा बायकोला हा गुलाब आवर्जून देऊ शकता.
advertisement
पिवळा–लाल गुलाब
जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि या प्रेमातून तुमच्या नात्यात पुढे काही घडावं असं वाटत असेल तर पिवळा आणि लाल गुलाब अशा कॉम्बिनेशनमध्ये बुके तयार करून देऊ शकता. यातून असा संदेश दिला जाईल, की त्या समोरच्या व्यक्तीच्या तुम्ही आणखी जवळ जाऊ इच्छिता आणि काही नातं निर्माण करावं, अशी तुमची भावना आहे.
advertisement
पांढरा–लाल गुलाब
तुमच्या आयुष्यात अगोदरच असलेली ती स्पेशल व्यक्ती तुमच्यासाठी किती परफेक्ट आहे, हे व्यक्त करण्यासाठी पांढरा आणि लाल गुलाबांचा एकत्र असा गुच्छ दिला जातो. तुमच्या दोघांमधलं नातं अधिक दृढ होणं आणि त्यासाठी तुम्ही वाट्टेल ते करायला तयार आहात, याचं हे प्रतीक मानलं जातं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2024 11:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Rose Day 2024 : प्रेमासाठी लाल, तर मैत्रीसाठी पिवळा; गुलाबाच्या प्रत्येक रंगामागचा अर्थ माहितीये का?








