Safety Tips : पाणी तापवण्यासाठी इमर्शन रॉड वापरताय? 'या' 8 चुका टाळा, नाहीतर बेतेल जीवावर!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Safety tips while using immersion rod : या ऋतूमध्ये घरातील गिझर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. काही लोकांकडे गिझर नसतो, ते लोक पाणी तापवण्यासाठी इमर्शन रॉडचा वापर करतात. मात्र हे छोटेसे इमर्शन रॉड वापरताना बारूच खबरदारी घेणं आवश्यक आहे.
मुंबई : इतर ऋतूंमध्ये मस्त थंड पाण्याने अंघोळ करणारी लोकंही बऱ्याचदा हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर करतात. या ऋतूमध्ये घरातील गिझर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. काही लोकांकडे गिझर नसतो, ते लोक पाणी तापवण्यासाठी इमर्शन रॉडचा वापर करतात. मात्र हे छोटेसे इमर्शन रॉड वापरताना खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा यामुळे जीव गेल्याच्या घटनाही बऱ्याच घडतात.
इमर्शन रॉड वापरणं तसं सोपं असतं आणि हे गिझरपेक्षा स्वस्तही असतं त्यामुळे बरीच लोक याचा रोज वापर करतात. परंतु त्याचा वापर करताना एक छोटीशी चूक देखील आपल्याला खूप महाग पडू शकते. म्हणूनच इमर्शन रॉडचा योग्य वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे तुमची वीज वाचेल आणि तुम्ही सुरक्षित राहाल. इमर्शन रॉड वापरताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या..
advertisement
इमर्शन रॉड वापरताना या सामान्य चुका टाळा..
- जुने रॉड वापरण्याची चूक करू नका. काही लोक वर्षानुवर्षे एकच रॉड वापरत राहतात. हे धोकादायक असू शकते. विशेषतः जर रॉडवर गंज किंवा जाड पांढरा थर जमा असेल तर ते वापरणे टाळा. असे रॉड जास्त वीजदेखील वापरतात.
- इमर्शन रॉडने पाणी गरम करण्यासाठी नेहमी प्लास्टिकची बादली किंवा भांडे वापरा. लोखंडी बादली वापरणे टाळा, कारण विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.
advertisement
- इमर्शन रॉड चालू करण्यापूर्वी, रॉड पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे का ते तपासा. तो चालू केल्यानंतर त्याला स्पर्श करणे टाळा.
- बादलीत रॉड ठेवण्याची आणि लगेच ते चालू करण्याची चूक करू नका. जर बादलीत पाणी कमी असेल तर रॉड बंद करा आणि बादलीत पाणी घाला. अन्यथा, तुम्हाला विजेचा धक्का लागू शकतो.
advertisement
- इमर्शन रॉड बंद न करता बादलीतून गरम पाणी काढण्याची चूक करू नका. प्रथम रॉड बंद करा, नंतर पाणी त्यातून पाणी घ्या.
- बटन बंद केल्यानंतर लगेच रॉड बाहेर काढू नका. रॉड अजूनही खूप गरम असतो. म्हणून पाण्यातून काढण्यापूर्वी तो बंद केल्यानंतर 20 ते 25 सेकंद थांबा.
- बदलीमध्ये रॉड ठेऊन विसरून जाऊ नका. जेव्हा पाणी खूप गरम होते तेव्हा ते वाफेत बदलू लागते आणि बादलीतील पाणी हळूहळू कमी होते. या परिस्थितीत, गरम रॉड बादली वितळवू शकतो किंवा आग देखील लावू शकतो. म्हणून रॉड टाकल्यानंतर पाणी पुरेसे गरम आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यावर लक्ष ठेवा. पाणी पुरेसे गरम झाल्यावर, रॉड बंद करा आणि तो पाण्यातून काढून टाका.
advertisement
- रॉड खरेदी करताना, नेहमी ISI मार्क तपासा आणि तो 150 ते 200 वॅट्स आणि 230-250 व्होल्टला सपोर्ट करायला हवा. नेहमी चांगल्या दर्जाचा इमर्शन रॉड खरेदी करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 4:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Safety Tips : पाणी तापवण्यासाठी इमर्शन रॉड वापरताय? 'या' 8 चुका टाळा, नाहीतर बेतेल जीवावर!


