अचानक घरी पाहुणे आले तर काय नाश्ता कराल; मुरमुऱ्यांचा झटपट डोसा कधी ट्राय केलाय का?

Last Updated:

अनेकांना मुरमुऱ्यापासून बनवलेला डोसा आवडतो, शिवाय तो अवघ्या काही मिनिटांमध्ये तयार होतो. मुरमुरे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यापासून बनवलेला डोसादेखील खूप आरोग्यदायी असतो.

News18
News18
मुंबई, 27 सप्टेंबर : मुरमुरे अर्थात चुरमुऱ्यापासून बनवलेले लाडू तुम्ही खाल्ले असतील. फुटाणे, शेव यांच्यासोबत स्नॅक्स म्हणून मुरमुरेदेखील अनेकजण खातात. पण तुम्ही कधी मुरमुऱ्यापासून बनवलेला डोसा खाल्ला आहे का? दक्षिण भारतीय खाद्य डोसा खूप लोकप्रिय आहे. हा डोसा अनेक प्रकारे बनवला जातो. मुरमुऱ्यापासूनसुद्धा डोसा बनवला जातो, जो नाश्त्यात किंवा स्नॅक म्हणून अनेकजण खातात. अनेकांना मुरमुऱ्यापासून बनवलेला डोसा आवडतो, शिवाय तो अवघ्या काही मिनिटांमध्ये तयार होतो.
मुरमुरे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यापासून बनवलेला डोसादेखील खूप आरोग्यदायी असतो. रवा, बेसन आणि ताक यांचाही वापर मुरमुऱ्यापासून डोसा बनवण्यासाठी केला जातो. चला तर, मुरमुऱ्यापासून डोसा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊ.
मुरमुरा डोसा बनवण्यासाठी साहित्य
मुरमुरे - 2 कप
रवा - अर्धा कप
ताक - 3/4 कप
गव्हाचं पीठ - 2 मोठे चमचे
advertisement
बेसन - 2 मोठे चमचे
चिरलेला कांदा - अर्धा
शिमला मिरची बारीक चिरून - 1
कोथिंबीर - 2 ते 3 चमचे
तिखट - 1/2 चमचा
चाट मसाला - 1/2 चमचा
काळं मीठ - 1/4 चमचा
किसलेलं चीज - 1/2 कप
बेकिंग सोडा - 1/4 चमचा
लिंबाचा रस - 1/2 चमचा
advertisement
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
असा करा मुरमुरा डोसा
मुरमुरा डोसा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मुरमुरे स्वच्छ करा, व ते एका भांड्यात पाणी टाकून भिजत ठेवा. आता आणखी एका भांड्यात रवा घ्या, व त्यात ताक घालून मिक्स करा. दोन्ही भांडी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा. असं केल्यानं रवा व मुरमुरे फुगतात. यानंतर, मुरमुरे पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घ्या. आता भिजवलेला रवा, बेसनाचं पीठ, गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ घेऊन त्यात थोडेसं पाणी घाला, व त्याचं गुळगुळीत आणि मध्यम जाडीचं पीठ तयार होईपर्यंत मिश्रण करा. यानंतर, तयार केलेलं पीठ मिक्सरच्या भांड्यात घ्या, व ते कमीतकमी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स करा. आता तयार केलेलं पीठ झाकून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवा. जर पीठ खूप घट्ट झालं असेल, तर तुम्ही त्यात थोडं पाणी मिक्स करू शकता.
advertisement
या नंतर पिठात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. आता नॉनस्टिक पॅन घ्या, व गॅसवर ठेऊन गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं पाणी शिंपडा, आणि तो सुती कापडानं पुसून घ्या. यानंतर एका भांड्यात तयार केलेलं पीठ घेऊन ते तव्यावर डोसा घालतो तसं घाला व गोलाकार पसरवा. थोड्या वेळानंतर डोश्याच्या कडांना थोडं तेल लावा. डोश्याचा वरचा भाग कोरडा झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि किसलेलं चीज टाका. यानंतर त्यावर तिखट, काळं मीठ आणि चाट मसाला टाका. आता गरमागरम डोसा सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अचानक घरी पाहुणे आले तर काय नाश्ता कराल; मुरमुऱ्यांचा झटपट डोसा कधी ट्राय केलाय का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement