श्रद्धेच्या नावाखाली नरभक्षण, इथे मृत नातेवाईकांचा मांस खाण्याची आहे भयानक प्रथा; कारण ऐकाल तर धक्काच बसले
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे ऐकायला खूप भयानक आणि किळसवाणं वाटत असलं, तरी या जमातीसाठी हे प्रेम आणि आदराचं प्रतीक होतं. मात्र, याच परंपरेने अशा एका गूढ आजाराला जन्म दिला, ज्याने या जमातीतील महिलांचे अस्तित्वच धोक्यात आणले.
मुंबई : जगभरात विविध संस्कृती आणि त्यांच्या परंपरा पाहायला मिळतात. सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगळ्या असतात. आपल्याकडे प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला की आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विधिवत अंत्यसंस्कार करतो. पण, जगाच्या एका कोपऱ्यात अशीही एक जमात होती, जी आपल्या मृत नातेवाईकाचा मृतदेह दफन न करता किंवा न जाळता चक्क खातात. हे ऐकायला खूप भयानक आणि किळसवाणं वाटत असलं, तरी या जमातीसाठी हे प्रेम आणि आदराचं प्रतीक होतं. मात्र, याच परंपरेने अशा एका गूढ आजाराला जन्म दिला, ज्याने या जमातीतील महिलांचे अस्तित्वच धोक्यात आणले.
पापुआ न्यू गिनीमधील 'फोर' (Fore) नावाच्या जमातीमध्ये 'एंडोकॅनिबलिझ्म' (Endocannibalism) नावाचा विधी प्रचलित होता. याचा अर्थ होतो, आपल्याच कुटुंबातील किंवा जमातीतील मृत व्यक्तीचे मांस खाणे. आपल्या लाडक्या व्यक्तीचा मृतदेह मातीत गाडला तर त्याला कीडे खातील, त्यापेक्षा आम्हीच त्यांना खाल्लेले बरे, अशी त्यांची समजूत होती. आपल्या नातेवाईकाचा देह स्वतःच्या शरीरात सामावून घेतल्याने त्यांची आत्मा आपल्यामध्येच जिवंत राहील, असा या जमातीचा ठाम विश्वास होता.
advertisement
हा विधी पार पाडण्याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांची असे. मृतक पुरुषाचे किंवा महिलेचे अवयव, विशेषतः मेंदू, अत्यंत काळजीपूर्वक काढून बांबूच्या टोपल्यांमध्ये शिजवला जात असे. कधीकधी लहान मुलेही यात सहभागी व्हायची. मात्र, 8 वर्षांवरील मुलांना यातून लांब ठेवून पुरुषांच्या गटात पाठवले जात असे. पित्ताशय वगळता शरीराचे सर्व भाग अन्नासारखे खाल्ले जात असत.
advertisement
1950 च्या दशकात या विधीचे भयंकर परिणाम समोर येऊ लागले. या जमातीमध्ये 'कुरु' (Kuru) नावाचा एक जीवघेणा मज्जासंस्थेचा आजार पसरला. या आजाराची लक्षणे अतिशय विचित्र होती:
रुग्णाच्या अंगाला प्रचंड कंप सुटणे.
विनाकारण आणि अनियंत्रितपणे हसू येणे (यामुळेच याला 'लाफिंग डेथ' असेही म्हटले जाते).
चालताना तोल जाणे आणि शेवटी स्वतःहून जेवणही न करता येणे.
advertisement
सुरुवातीला जमातीच्या लोकांना वाटले की हा एखादा जादूटोणा आहे. पण नंतर लक्षात आले की, हा आजार मृत व्यक्तीचा मेंदू खाल्ल्यामुळे पसरत आहे. 1950 च्या काळात या आजाराने फोर जमातीतील महिलांचा अक्षरशः सफाया करण्यास सुरुवात केली.
या आजाराची भीषणता पाहून 1960 च्या सुमारास ही प्रथा बंद करण्यात आली. मात्र, 'कुरु' आजाराचे जंतू (Prions) मानवी शरीरात अनेक दशके सुप्त अवस्थेत राहू शकतात. 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन संशोधक मायकल एल्पर्स यांनी कुरु आजाराचा शेवटचा रुग्ण शोधला होता. या आजाराचे निरीक्षण 2012 पर्यंत सुरू होते, त्यानंतर अधिकृतपणे ही महामारी संपल्याचे जाहीर करण्यात आले.
advertisement
पापुआ न्यू गिनीमधील केवळ फोर जमातच नाही, तर 'अस्मत' (Asmat) नावाची दुसरी जमातही अशाच क्रूर कृत्यांसाठी ओळखली जात असे. पण त्यांचा विधी प्रेमासाठी नव्हता. ते त्यांच्या शत्रूंचे डोके धडावेगळे करून त्यांचे मांस खात असत. त्यांच्या मते, शत्रूला खाल्ल्याने त्यांची शक्ती आपल्याला प्राप्त होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
श्रद्धेच्या नावाखाली नरभक्षण, इथे मृत नातेवाईकांचा मांस खाण्याची आहे भयानक प्रथा; कारण ऐकाल तर धक्काच बसले










