तुम्हालाही अति घाम येतो? करा ‘या’ सोप्या गोष्टी; लगेच मिळतील फायदे
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
प्रवासादरम्यान अनेकदा आपल्याला घाम खूप येतो. फॅन सुरू असतानाही शरीराला खूप घाम येतो. याचं कारण आपल्या शरीरातील उष्णतेची पातळी असू शकते. अति घाम येणाऱ्यांनी प्राणायाम करणे योग्य ठरू शकते. कोण कोणते प्राणायाम तुम्ही करू शकता? याबाबत माहिती योग शिक्षिका सोनाली लोखंडे यांनी दिली आहे.
प्रवासादरम्यान अनेकदा आपल्याला घाम खूप येतो. फॅन सुरू असतानाही शरीराला खूप घाम येतो. याचं कारण आपल्या शरीरातील उष्णतेची पातळी असू शकते.



चंद्रभेदी प्राणायाम म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन उजव्या नाकपुडीतून सोडणे. त्यामुळे आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह होऊन आपल्या शरीरातील उष्णता बॅलन्स होते, असं त्यांनी सांगितलं.
advertisement

प्राणायाम केल्यामुळे शरीरातील उष्णतेची पातळी स्थिर राहून त्रास कमी होतो. प्राणायाम हा श्वासाचा व्यायाम आहे. त्यामुळे तो नक्की करून बघा.

प्राणायाममुळे शरीराला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे होतात. पचन सुधारते, तणाव कमी होतो, मनःशांती मिळते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 9:20 PM IST