Eating Banana empty stomach: सकाळी उठल्या-उठल्या केळी खात आहात? शरीरावर होतील ‘हे’ परिणाम; जाणून घ्या रिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदे आणि तोटे

Last Updated:

Benefits & disadvantages of eating Banana empty stomach: केळ्यांमध्ये असलेल्या फ्रुक्टोजमुळे शरीराला त्वरित उर्जा जरी मिळाली तरीही ती दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे उपाशी पोटी केळी खाल्ल्याने थेट फायदे होण्याऐवजी ॲसिडिटी वाढण्यासोबत रक्तातली साखर वाढण्याचाही धोका असतो. जाणून घेऊयात उपाशी पोटी केळी खाण्याचे फायदे आणि तोटे.

प्रतिकात्मक फोटो : सकाळी रिकाम्या पोटी केळी खाता ? जाणून घ्या फायदे आणि तोटे
प्रतिकात्मक फोटो : सकाळी रिकाम्या पोटी केळी खाता ? जाणून घ्या फायदे आणि तोटे
मुंबई : केळं हे एक असं फळ आहे जे लहानमोठ्यांपासून अनेकांना आवडतं. केळ्यात असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते आणि अपचन बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यापासून सुटका होते. केळी खाल्ल्याने भूक नियत्रंणात राहते, त्यामुळे जेवणापूर्वी केळी खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरीज पोटात जाण्याचा धोका टळतो. तर, जेवणानंतर केळी खाल्ल्यास अन्न पचायला मदत होते. केळ्याचे असे अनेक फायदे जरी असले तरीही केळ्यांमध्ये असलेल्या फ्रुक्टोज म्हणजेच नैसर्गिक साखरेमुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी केळी खाणं धोक्याच ठरू शकतं. याशिवाय वजन कमी करण्यासाठी अनेक जण केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे अनेक जण सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी केळी खातात. मात्र उपाशी पोटी केळी खाल्ल्याने भूक कमी होऊन शरीराला खरंच फायदा होईल ? की अन्य काही आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो ? असा प्रश्न आपल्या मनात उद्भवू शकतो.

जाणून घेऊयात केळी खाण्याचे फायदे आणि तोटे.

Eating Banana empty stomach: सकाळी उठल्या-उठल्या केळी खात आहात? शरीरावर होतील ‘हे’ परिणाम; जाणून घ्या रिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदे आणि तोटे
advertisement

रिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदे

1) त्वरित ऊर्जा : केळी हा ऊर्जेचा चांगला स्रोत ठरू शकतो. केळ्यात असलेली नैसर्गिक शर्करा म्हणजेच फ्रुक्टोज शरीरारा त्वरित उर्जा देतात. मात्र ही उर्जा दीर्घकाळ टिकणारी नसते. त्यामुळे केळ्यांमधली उर्जा संपल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं.
2) पचनास मदत:  केळ्यात असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. यामुळे आतडे आतून स्वच्छ व्हायला मदत होते. याशिवाय अन्न व्यवस्थित पचल्यामुळे गॅसेस, ॲसिडिटीचा त्रास होत नाही. त्यामुळे पोटाला आराम मिळतो.
advertisement
3) हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं : केळ्यांमध्ये भरपूर पोटॅशियम असतं.ज्यामुळे सोडियमचे नियंत्रित राहतं. त्यामुळे आपसूकच रक्तदाब नियंत्रित राहून हृदयावर ताण येत नाही. त्यामुळे केळी खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं.

केळी खाण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर पाहुयात रिकाम्या पोटी केळी खाण्याचे तोटे

1) ॲसिडिटी वाढण्याची भीती : केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज असतं. याशिवाय केळ्यात फायबर्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. त्यामुळे ज्यांना आधीपासून गॅसेस, पित्ताचा त्रास आहे अशांनी रिकाम्या पोटी केळी खाणं टाळावं. कारण रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास शरीरात पित्ताचं प्रमाण वाढून ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे पोटात जळजळ जाणवू शकते.
advertisement
2) संतुलित आहाराचा अभाव: केळ्यांमध्ये फक्त फायबर्स आणि खनिजं असतात. मात्र त्यात प्रथिनं आणि फॅट्सचा अभाव दिसून येतो. त्यामुळे फक्त केळी खाल्ल्याने शरीराला परिपूर्ण असा पौष्टिक आणि संतुलित आहार मिळत नाही.
3)रक्तातील साखर वाढण्याचा धोका:केळ्यांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे त्यामुळे रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने अचानक रक्तातल्या साखरेची पातळी वाढू शकते. ज्याचा परिणाम इन्सुलिनच्या पातळीवरही होऊ शकतो. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्य व्यक्तींनी उपाशी पोटी केळं खाणं टाळावंच. याशिवाय त्यांनी, केळी खायची असतील तर डॉक्टरांच्या सल्लानुसारच केळी खावीत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eating Banana empty stomach: सकाळी उठल्या-उठल्या केळी खात आहात? शरीरावर होतील ‘हे’ परिणाम; जाणून घ्या रिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदे आणि तोटे
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement