Diabetes Care Tips: काय सांगता? नाश्ता टाळण्याने डायबिटीस वाढू शकतो ? डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी

Last Updated:

Disadvantages of skipping breakfast in Marathi: डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी नाश्ता हे सर्वात महत्त्वाचं जेवण आहे. शरीरातली ऊर्जा राखण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि दीर्घकालीन समस्यांचा धोका कमी करण्यासाठी नाश्ता महत्त्वाचा आहे.

प्रतिकात्मक फोटो :काय सांगता? नाश्ता टाळण्याने डायबिटीस वाढू शकतो ? डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी
प्रतिकात्मक फोटो :काय सांगता? नाश्ता टाळण्याने डायबिटीस वाढू शकतो ? डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी
मुंबई : डायबिटीसची ओळख एक जीवघेणा आजार अशी झालीये. सुरूवातीला एका गोळीपर्यंत मर्यादीत असलेला डायबिटीस इन्सुलिनच्या इंजेक्शनपर्यंत कसा पोहोचतो हे कळतच नाही. किंबहुना कळलं तरीही फार उशीर झालेला असतो. त्यामुळे शुगर किंवा रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अशी लोकं सकाळचा नाश्ता करणं टाळतात किंवा नाश्ता कमी करतात. त्यांना असं वाटतं की असं केल्याने डायबिटीस नियंत्रणात राहू शकेल. मात्र हे चुकीचं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी नाश्ता हे सर्वात महत्त्वाचं जेवण आहे. शरीरातली ऊर्जा राखण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि दीर्घकालीन समस्यांचा धोका कमी करण्यासाठी नाश्ता महत्त्वाचा आहे. आहारतज्ञ कनिका मल्होत्रा ​​यांच्या मते, नाश्ता न केल्याने मधुमेहींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नाश्ता न केल्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढण्यापासून ते आरोग्याच्या अन्य समस्याही उद्भवू शकतात.
नुकत्याच एका मुलाखतीत, मल्होत्रा यांनी डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी नाश्ता न करण्याचे संभाव्य धोके सांगितले आहेत.

इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते :

एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, सकाळी नाश्ता न केल्याने इन्सुलिनची पातळी बिघडू शकते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं अधिक कठीण होते. जेव्हा आपण काहीही खातो त्याच्या साधारण दीड तासाने पॅन्क्रियाजमधून इन्सुलिन स्रवायला सुरूवात होते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांना सतत 2 तासानी थोडं थोडं खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून इन्सुलिन रक्तात स्रवत राहून रक्तातली साखर नियंत्रणात राहील.
advertisement
Disadvantages of skipping breakfast in Marathi: काय सांगता? नाश्ता टाळण्याने डायबिटीस वाढू शकतो ? डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी

रक्तातील साखरेची अनियमिता:

सकाळचा नाश्ता न केल्याने रात्रीच्या जेवणानंतर थेट दुपारचं जेवण होणार असल्याने पॅन्क्रियाजमधून इन्सुलिन स्रवण्याचा कालावधी वाढून इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता  वाढण्याची भीती असते. त्यामुळे टाईप 2 डायबिटीसचं रूपांतर डायबिटीसमध्ये होण्याची भीती असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं कठीण होऊन जातं.
advertisement

आरोग्यावार होणारे दुष्परिणाम :

नाश्ता न केल्याने रक्तातल्या साखरेची पातळी अनियंत्रित राहून हायपरग्लाइसेमियामुळे डोळ्यांच्या रेटिनाच्या समस्या, किडनीचे विकारमूत्रपिंडाचे आणि मेंदूविकाराचा धोका वाढतो.

मानसिक आरोग्यावर परिणाम:

नाश्ता वगळल्याने जास्त प्रमाणात भूक लागते, यामुळे मूड स्विंग्स आणि रक्तातील साखरेतील चढउतारांमुळे चिडचिडेपणा येतो. दीर्घकाळ उपाशी राहिल्याने थकवा येऊन नैराश्य येण्याची भीती असते.
advertisement

वजन वाढण्याची भीती :

सकाळी नाश्ता न केल्याने जास्त भूक लागते, त्यामुळे एकाचवेळी जास्त खाणं होतं. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जाऊन वजन वाढण्याची भीती असते.
आहारतज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या लोकांनी नाश्ता टाळण्यापेक्षा कमी साखर आणि जास्त प्रोटिन्स आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes Care Tips: काय सांगता? नाश्ता टाळण्याने डायबिटीस वाढू शकतो ? डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement