Airport Divorce : एअरपोर्ट घटस्फोट म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा नवीन ट्रॅव्हल ट्रेंड का वाढतोय? पाहा कारण

Last Updated:

What is airport divorce : एअरपोर्टचं वातावरण असं असतं की, चांगल्या-चांगल्या कपल्सचीही चिडचिड होते. याच रोजच्या त्रासावर उपाय म्हणून सोशल मीडियावर एक नवा आणि मजेशीर ट्रेंड समोर आला आहे, ज्याला 'एअरपोर्ट डिव्होर्स' असं म्हटलं जात आहे.

विमानतळ घटस्फोट म्हणजे काय?
विमानतळ घटस्फोट म्हणजे काय?
मुंबई : तुम्ही कधी तुमच्या पार्टनरसह प्रवास करताना एअरपोर्टवर वाद घातला आहे का? कधी उशिरा पोहोचल्यामुळे, कधी लांबलचक रांगेत उभं राहावं लागल्यामुळे, तर कधी ड्युटी-फ्री शॉपिंगवरून मतभेद झाले असतील. असं झालं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. एअरपोर्टचं वातावरण असं असतं की, चांगल्या-चांगल्या कपल्सचीही चिडचिड होते. याच रोजच्या त्रासावर उपाय म्हणून सोशल मीडियावर एक नवा आणि मजेशीर ट्रेंड समोर आला आहे, ज्याला 'एअरपोर्ट डिव्होर्स' असं म्हटलं जात आहे.
नाव ऐकून जरी असं वाटत असलं की, याचा संबंध नातं तुटण्याशी आहे, तरी प्रत्यक्षात याचा अर्थ तसा अजिबात नाही. एअरपोर्ट डिव्होर्स म्हणजे खरा घटस्फोट नव्हे तर प्रवास अधिक सोपा आणि तणावमुक्त करण्यासाठी कपल्समध्ये ठरवून घेतलेली तात्पुरती आणि नियोजित अंतर ठेवण्याची पद्धत आहे. यामागचा उद्देश भांडण टाळणं आणि एकमेकांना थोडी मोकळीक देणं हाच असतो.
advertisement
एअरपोर्ट डिव्होर्सची सुरुवात चेक-इन, सिक्युरिटी आणि इतर आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर होते. त्यानंतर कपल परस्पर संमतीने काही वेळासाठी वेगवेगळे राहतात. उदाहरणार्थ, एका पार्टनरला ड्युटी-फ्रीमध्ये स्किनकेअर किंवा परफ्युम पाहायला आवडतं तर दुसऱ्याला गेटजवळ बसून शांतपणे कॉफी पिणं किंवा स्नॅक्स घेणं आवडतं. अशा वेळी दोघेही आपापल्या आवडीनुसार वेळ घालवतात आणि बोर्डिंगच्या वेळी पुन्हा एकत्र येतात. या छोट्याशा ब्रेकनंतर दोघांनाही अधिक शांत, आनंदी आणि रिलॅक्स वाटतं.
advertisement
हा ट्रेंड सर्वात आधी ट्रॅव्हल रायटर ह्यू ऑलिव्हर यांनी त्यांच्या एका कॉलममध्ये “रिलेशनशिप-सेव्हिंग ट्रिक” म्हणून मांडला होता. त्यांच्या मते, एअरपोर्ट डिव्होर्समुळे फ्लाइटपूर्वी होणारा तणाव आणि मेल्टडाउन टाळता येतो. त्यानंतर ही संकल्पना सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली, विशेषतः Gen Z आणि मिलेनियल्समध्ये, जे नात्यांमध्ये भावनिक समज आणि वैयक्तिक स्पेसला जास्त महत्त्व देतात.
advertisement
इंस्टाग्रामवर #AirportDivorce या हॅशटॅगखाली लोक मजेशीर व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत आहेत. अनेक कपल्स सांगत आहेत की, या छोट्याशा “ब्रेक”मुळे त्यांच्या सुट्टीची सुरुवात अधिक चांगली झाली. काहींच्या मते यामुळे विनाकारण होणारे वाद कमी होतात, तर काही जणांना वाटतं की नात्यात गुदमरल्यासारखं वाटत नाही. हा ट्रेंड फक्त सामान्य लोकांपुरताच मर्यादित नाही. अनेक सेलिब्रिटी कपल्सनेही ही कल्पना स्वीकारल्याचं सांगितलं आहे. प्रसिद्ध टीव्ही होस्ट केली रिपा आणि तिचा पती मार्क कन्सुएलोस यांनीसुद्धा सांगितलं आहे की, त्यांना एअरपोर्टवर वेगवेगळ्या पद्धतीने वेळ घालवायला आवडतं. एकाला लवकर पोहोचणं आवडतं, तर दुसऱ्याला अगदी शेवटच्या क्षणी येणं पसंत असतं. त्यामुळे ते बोर्डिंगपर्यंत वेगळे राहतात आणि फ्लाइटमध्ये एकत्र असतात.
advertisement
एअरपोर्ट डिव्होर्स ही संकल्पना मुळात हे मान्य करते की, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तिच्या प्रवासाच्या सवयीही वेगळ्या असू शकतात. याचा अर्थ नात्यात अंतर निर्माण करणं नसून, एकमेकांच्या आवडी-निवडी आणि वैयक्तिक स्पेसचा आदर करणं आहे. कधी कधी प्रेमात थोडीशी मोकळीक नातं अधिक मजबूत करते. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या पार्टनरसह प्रवास करत असाल आणि एअरपोर्टवरील तणाव टाळायचा असेल, तर हा ट्रेंड नक्की एकदा वापरून पाहा. कदाचित फ्लाइटपूर्वीचं हे छोटंसं अंतर तुमची संपूर्ण जर्नी अधिक सोपी आणि आनंददायी बनवेल.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Airport Divorce : एअरपोर्ट घटस्फोट म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा नवीन ट्रॅव्हल ट्रेंड का वाढतोय? पाहा कारण
Next Article
advertisement
Dry Day In Maharashtra: तीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?
तीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?
  • आजपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या 'मधुशाला' बंद राहणार आहेत.

  • पुढील तीन दिवस तळीरामांचे हाल होणार असून ड्राय डे असणार आहे.

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आह

View All
advertisement