Snake Bite : अंगावर काटा आणणारी घटना! 3 तुकडे झालेल्या सापाने घेतला 18 वर्षांच्या तरुणीचा जीव; तासाभरातच मृत्यू
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेकदा सापाच्या दवंशाने जीव गेल्याचा घटना अनेकदा ऐकू येतात. ग्रामीण भागात या घटना सामान्य आहेत आणि यावर काय उपचार करावेत हे देखील तिथल्या लोकांना ठाऊक असत. पण विचार करा, जर मृत सापाने चावा घेतल्याचं तुम्ही ऐकलं तर.
Will Dead Snake Bite Can Cause Death : नवदंडा गावात एका 18 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला असून, या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. भारती नावाच्या या तरुणीचा मृत्यू तुकडे झालेल्या सापाच्या चाव्याने झाल्याचे समोर आले आहे. मृत्यूनंतर सापाने चावा घेणे कसे शक्य आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. अनेकदा सापाच्या दवंशाने जीव गेल्याचा घटना अनेकदा ऐकू येतात. ग्रामीण भागात या घटना सामान्य आहेत आणि यावर काय उपचार करावेत हे देखील तिथल्या लोकांना ठाऊक असत. पण विचार करा, जर मृत सापाने चावा घेतल्याचं तुम्ही ऐकलं तर? हो, अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भारती चारा मशीनमध्ये चारा कापत होती. गवताच्या ढिगाऱ्यात एक विषारी साप दडलेला होता. मशीन सुरू झाल्यावर हा साप त्यात ओढला गेला आणि त्याचे धडापासून वेगळे असे तीन तुकडे झाले. दुर्दैवाने, भारतीला हे तुकडे गवतात दिसले नाहीत. तिने जेव्हा गवताचा ढिगारा उचलला, तेव्हा सापाच्या तुटलेल्या डोक्याच्या भागाने तिच्या हाताला दोन वेळा चावा घेतला. एका 18 वर्षांच्या तरुणीला मृत सापाने दंश केला आणि तिचा तासाभरातच मृत्यू झाला.
advertisement
तुकडे झाल्यानंतरही सापाने चावा घेणे, यामागचे विज्ञान
मृत्यूनंतरही सापाने चावा घेणे ही घटना अत्यंत दुर्मिळ असली तरी, ती पूर्णपणे वैज्ञानिक आहे.
शरीरातील प्रतिक्षेप क्रिया: सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये, 'प्रतिक्षेप क्रिया' मेंदूच्या नियंत्रणाशिवाय काम करत राहते. सापाचे डोके शरीरापासून वेगळे झाल्यानंतरही, सापाच्या जबड्यातील स्नायू आणि डोक्याच्या भागातील नसा काही काळ कार्यरत राहतात.
गँग्लियाचे कार्य: सापाच्या डोक्यात आणि शरीरात गँग्लिया नावाच्या नसांचे छोटे जाळे असते. या नसा बाहेरील उत्तेजनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी तयार असतात.
advertisement
उत्तेजना आणि चावा: तुटलेल्या सापाच्या डोक्याला किंवा तोंडाला कोणताही स्पर्श झाल्यास, ही प्रतिक्षेप चावा क्रिया लगेच कार्यान्वित होते आणि साप चावा घेतो.
क्रियाशील कालावधी: सापाच्या प्रजातीनुसार आणि तापमान किती आहे यावर ही क्रिया अवलंबून असते. अनेक विषारी सापांचे डोके, मृत्यूनंतरही 20 ते 90 मिनिटांपर्यंत सक्रिय राहू शकते.
विषारी ग्रंथी: डोके वेगळे झाले असले तरी, विषारी ग्रंथी आणि दात डोक्याच्या भागात शाबूत राहतात. चावा घेताना, स्नायूंच्या आकुंचनामुळे विष पूर्ण ताकदीने शरीरात सोडले जाते, जे जीवावर बेतू शकते.
advertisement
धोक्याची जाणीव: त्यामुळे, साप पूर्णपणे मरून निष्क्रिय झाला आहे याची खात्री होईपर्यंत त्याच्या मृत शरीराच्या किंवा डोक्याच्या तुकड्यांना स्पर्श करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी, सापाला मारल्यानंतरही त्याच्या शरीरापासून दूर राहणे आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे, अत्यंत आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Snake Bite : अंगावर काटा आणणारी घटना! 3 तुकडे झालेल्या सापाने घेतला 18 वर्षांच्या तरुणीचा जीव; तासाभरातच मृत्यू


