Chicken Protein : चिकनच्या कोणत्या भागामध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या, होईल जास्त फायदा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Which part of chicken has more protein : चिकन हे सहज पचणारे, चवदार आणि प्रथिनांनी समृद्ध असल्याने आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. मात्र, चिकन खाल्लं म्हणजे सारखंच पोषण मिळतं असं नाही. चिकनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळं असतं.
मुंबई : हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जा आणि उष्णतेची गरज असते. त्यामुळे या ऋतूमध्ये अनेकजण आहारात नॉनव्हेज पदार्थांचा समावेश करतात. विशेषतः चिकन खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चिकन हे सहज पचणारे, चवदार आणि प्रथिनांनी समृद्ध असल्याने आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. मात्र, चिकन खाल्लं म्हणजे सारखंच पोषण मिळतं असं नाही. चिकनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळे कोणता भाग खाल्ल्यास शरीराला जास्त प्रथिने मिळतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
आजकाल आरोग्याच्या कारणांमुळे बहुतांश लोक लाल मांस खाणं टाळतात आणि त्याऐवजी चिकनला प्राधान्य देतात. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, स्नायू मजबूत करायचे असतील किंवा शरीराला आवश्यक पोषण द्यायचं असेल, तर चिकन हा उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात गरमागरम चिकन सूप, उकडलेलं किंवा ग्रिल्ड चिकन खाणं तर अनेकांच्या आवडीचं असतं.
बहुतेक लोक चिकन खाताना चवीनुसार तुकडे निवडतात, पण पोषणमूल्यांचा विचार कमी करतात. प्रत्यक्षात चिकनच्या स्तन, थाय, लेग पीस आणि विंग्स या प्रत्येक भागामध्ये प्रथिनांचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळे तुम्ही कोणत्या कारणासाठी चिकन खात आहात - वजन कमी करणे, फिटनेस वाढवणे किंवा फक्त चव.. यावरून योग्य भाग निवडणं गरजेचं आहे.
advertisement
चिकन ब्रेस्ट : चिकन ब्रेस्ट म्हणजेच कोंबडीचा स्तन हा प्रथिनांचा सर्वात उत्तम स्रोत मानला जातो. एका चिकन ब्रेस्टमध्ये साधारणपणे 54 ग्रॅम प्रथिने असतात. म्हणजेच प्रति 100 ग्रॅममध्ये सुमारे 26 ग्रॅम प्रोटीन मिळते. यामध्ये फॅट कमी असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि जिम करणाऱ्यांसाठी हा भाग अत्यंत उपयुक्त आहे.
चिकन थाय : चिकन थायमध्ये तुलनेने थोडं जास्त फॅट असतं, पण प्रथिनांचं प्रमाणही चांगलं असतं. चिकन थायमध्ये अंदाजे 13.5 ग्रॅम प्रथिने असतात. प्रति 100 ग्रॅममध्ये हे प्रमाण सुमारे 28.3 ग्रॅम इतकं असतं. ज्यांना चवदार आणि रसदार चिकन आवडतं, त्यांच्यासाठी थाय हा उत्तम पर्याय ठरतो.
advertisement
चिकन लेग पीस : चिकन लेग पीसमध्ये साधारणपणे 12.4 ग्रॅम प्रथिने आढळतात. प्रति 100 ग्रॅममध्ये यामध्येही सुमारे 28.3 ग्रॅम प्रोटीन असते. हा भाग चविष्ट असून उर्जादायक मानला जातो. हिवाळ्यात शरीराला ताकद देण्यासाठी हा भाग उपयुक्त ठरतो.
चिकन विंग्स : चिकन विंग्स म्हणजेच पंखांमध्ये तुलनेने प्रथिनांचं प्रमाण कमी असलं तरी प्रति 100 ग्रॅममध्ये सुमारे 30.5 ग्रॅम प्रोटीन असते. मात्र, विंग्समध्ये त्वचा आणि फॅट जास्त असल्याने ते मर्यादित प्रमाणात खाणं अधिक योग्य ठरतं.
advertisement
एकूणच पाहिलं तर चिकन हे प्रथिनांनी समृद्ध आणि आरोग्यासाठी फायदेशीर अन्न आहे. जर तुम्हाला जास्त प्रोटीन आणि कमी फॅट हवं असेल, तर चिकन ब्रेस्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर चव आणि उर्जा दोन्ही हवी असतील, तर थाय किंवा लेग पीस निवडू शकता. योग्य भाग निवडून आणि संतुलित प्रमाणात चिकन खाल्ल्यास हिवाळ्यात तुमचं आरोग्य नक्कीच उत्तम राहील.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Chicken Protein : चिकनच्या कोणत्या भागामध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या, होईल जास्त फायदा









