Tulsi Vivah : तुळशी विवाहानंतरच माणसांची लग्न का लावतात, त्याआधी का नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Tulsi Vivah Wedding Story : दिवाळी संपली की प्रतीक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची आणि एकदा का तुळशीचं लग्न झालं की लगीनसराई सुरू होते. तुळशीचं लग्न झालं आता आपण लग्नाला मोकळे अशी स्थिती असते. पण तुळशीच्या लग्नानंतर माणसांची लग्न का लावली जातात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दिवाळी झाल्यावर कार्तिक महिन्यातील द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह असतो.  तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते असं म्हणतात. मोठ्या उत्साहात तुळशी विवाह संपन्न होतात. तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नसराई होते.
ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, तुळशी विवाहानंतरच लग्न कार्य करण्यामागे चातुर्मास कारण आहे. चातुर्मास म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकदशी हा चार महिन्यांचा काळ. असं म्हणतात की या 4 महिन्यांच्या कालावधीत भगवान विष्णू झोपलेले असतात.
advertisement
कार्तिकशुद्ध एकादशीच्या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. ज्यामुळे याला देवउठनी एकादशी असे म्हणतात. देवाची निद्रा पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी स्वरुप तुळशीशी त्यांचा विवाह लावला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी वृंदेला वरदान दिले की ती त्यांच्या शालिग्राम रूपाशी विवाह करेल. त्यानंतर विष्णूपूजेत तुळशीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुळशी विवाहाला आणि विष्णू रुपी शालीग्राम पूजनाला विशेष महत्त्व आहे. यानंतर सर्व मानवी विवाहांचा मार्ग मोकळा होतो, असं मानलं जातं.
advertisement
हे झालं धार्मिक कारण पण यामागे वैज्ञानिक कारणही आहे. यावेळी हेमंत ऋतूचे वेध सुरू होतात. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समर्पक असतो.  कमी जास्त होत असलेली शरीरातील शक्ती दिवाळीनंतर पुन्हा सुधारण्यास सुरुवात होते. त्यामुळे हा काळ स्त्री-पुरुषांच्या मिलनासाठी आदर्श ठरतो. गर्भसंस्कारातही उत्तम अपत्य प्राप्तीसाठी हेमंत ऋतू उत्तम मानला जातो.
advertisement
कधी आहे तुळशी विवाह?
यंदा तुळशी विवाहाचे मुहूर्त 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आहेत. 2 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल द्वादशी सकाळी 7.31 वाजता सुरू होत आहे.
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.35 वाजल्यापासून आहे, कारण त्यावेळी सूर्यास्त होऊन प्रदोषकाल सुरू होतो.
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 5.35 ते 6.01
advertisement
संध्याकाळचा मुहूर्त: 5.35 ते 6.53
यावर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी दोन शुभ योग जुळून आले आहेत
त्रिपुष्कर योग: सकाळी 7.31 ते संध्याकाळी 5.03
सर्वार्थ सिद्धी योग: 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.03 ते 6.34
तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मुहूर्तांच्या तारखा
नोव्हेंबर 2025 - 2, 3, 5, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25, 30
advertisement
डिसेंबर 2025 - 4, 5, 6
फेब्रुवारी 2026 - 5, 6, 8, 10, 12, 14, 19, 20, 21, 24, 25 आणि 26
मार्च 2026 - 1, 3, 4, 7, 8, 9, 11 आणि 12
एप्रिल 2026 - 15, 20, 21, 25, 26, 27, 28 आणि 29
advertisement
मे 2026 - 1, 3, 5, 6, 7, 8, 13 आणि 14
जून 2026 - 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 29
जुलै 2026 - 1, 6, 7 आणि 11
नोव्हेंबर 2026 - 21, 24, 25 आणि 26
डिसेंबर 2026 - 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12
Location :
Delhi
First Published :
October 31, 2025 7:01 AM IST


