Skin Care Mistakes : नकळत तुमची त्वचा तुम्हीच खराब करताय! निरोगी त्वचेसाठी आत्ताच थांबवा 'या' चुका..

Last Updated:

Top Mistakes Ruining Your Skin : अनेकदा आपण नकळत काही चुका करतो ज्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकते. चुकीच्या सवयींमुळे मुरुम, अकाली वृद्धत्व आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

निरोगी त्वचेसाठी कोणत्या चुका टाळायलाच हव्या?
निरोगी त्वचेसाठी कोणत्या चुका टाळायलाच हव्या?
मुंबई : आपली त्वाच निरोगी आणि तजेलदार असावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी अनेक जण विविध प्रकारे त्वचेची काळजी घेतात. परंतु असं असलं तरी तुम्ही नकळत अशा काही चुका करत असता, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी होण्याऐवजी आणखी खराब होऊ शकते. या सामान्य चुका लक्षात घेऊन आणि त्या करणे टाळून तुम्ही तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारू शकता आणि एक चमकणारी त्वचा मिळवू शकता.
निरोगी त्वचा असावी असं प्रत्येकाला वाटतं. परंतु अनेकदा आपण नकळत काही चुका करतो ज्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकते. चुकीच्या सवयींमुळे मुरुम, अकाली वृद्धत्व आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या चुका लक्षात घेतल्या आणि त्या करणं टाळल्यास तुम्ही तुमची त्वचा अधिक निरोगी आणि तेजस्वी ठेवू शकता. निरोगी त्वचेसाठी कोणत्या चुका टाळायलाच हव्या हे जाणून घेऊया.
advertisement
योग्य प्रकारे चेहरा न धुणे..
चेहरा स्वच्छ धुणे ही त्वचेच्या काळजीमधील सर्वात मूलभूत गोष्ट आहे. विशेषतः त्वचा जास्त घाम, धूळ आणि प्रदूषणाच्या संपर्कात येते तेव्हा चेहरा अधिक योग्यपद्धतीने धुणे महत्त्वाचे असते. चेहरा योग्य प्रकारे न धुतल्यास छिद्र बंद होतात, मुरुम येतात आणि त्वचा निस्तेज दिसते. ही चूक टाळण्यासाठी नियमितपणे चेहरा धुण्याची सवय लावा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य आणि pH-संतुलित क्लीन्सरचा वापर दिवसातून दोनदा एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी करा, जेणेकरून त्वचेवरील सर्व घाण निघून जाईल.
advertisement
त्वचेचा प्रकार आणि गरजांकडे दुर्लक्ष करणे..
प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. अनेक लोक ट्रेंडनुसार प्रॉडक्ट्स वापरतात, पण ते त्यांच्या त्वचेला सूट होतात की नाही याचा विचार करत नाहीत. उदाहरणार्थ, 'कोरियन ग्लास स्किन' ट्रेंड प्रत्येक त्वचेसाठी योग्य नसू शकतो. तुमच्या त्वचेचा प्रकार आणि तिच्या विशिष्ट गरजा समजून घेणे महत्त्वाचे आहे. आवश्यक असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या त्वचेसाठी कोलॅजन सीरम, रेटिनॉल सीरम किंवा मोठे छिद्र कमी करणारे प्रॉडक्ट्स कोणते? हे जाणून घेतल्याने उत्तम परिणाम मिळतात.
advertisement
प्रॉडक्ट्समधील घटक आणि फॉर्म्युलेशनकडे दुर्लक्ष करणे..
आपल्या स्किनकेअर प्रॉडक्ट्समधील घटक आणि फॉर्म्युलेशन समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बरेच लोक फक्त ब्रँडचे नाव किंवा जाहिराती पाहून प्रॉडक्ट्स घेतात, पण त्यात काय आहे याचा विचार करत नाहीत. त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या प्रोडक्टमधील महत्त्वाचे घटक आणि त्यांचे फायदे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या त्वचेच्या विशिष्ट समस्यांवर काम करणाऱ्या वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या घटकांचा शोध घ्या. यामुळे तुम्ही योग्य निवड करू शकता आणि त्रासदायक किंवा निरोपयोगी प्रॉडक्ट्स टाळू शकता. यामुळे कालांतराने तुमची त्वचा निरोगी आणि तेजस्वी होईल.
advertisement
प्रदूषणापासून संरक्षणाकडे दुर्लक्ष करणे..
प्रदूषण हा त्वचेच्या नुकसानीचा एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित घटक आहे. धूर, धूळ आणि बारीक कण त्वचेत प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो. यामुळे त्वचेचा नैसर्गिक रेझिस्टन्स बिघडतो आणि हायपरपिग्मेंटेशन, सेंसिटिव्हिटी आणि मुरुम व एक्जिमासारख्या समस्या वाढतात. या परिणामांचा सामना करण्यासाठी तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये अँटीऑक्सिडंट्सचा समावेश करणे आवश्यक आहे. 'एडलवाईज' नावाचे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करून प्रदूषणाने होणारे नुकसान दुरुस्त करते. एडलवाईजमध्ये रेटिनॉलपेक्षा 43 टक्के जास्त अँटीऑक्सिडंट शक्ती असतात. त्यामुळे ते तुमच्या त्वचेच्या काळजीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
advertisement
सनस्क्रीनचा अयोग्य वापर..
सनस्क्रीनचा योग्य वापर त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोक फक्त उन्हाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावतात किंवा फक्त SPF रेटिंगवर लक्ष केंद्रित करतात आणि UVA संरक्षणाकडे दुर्लक्ष करतात. परंतु UVA (PA+++) आणि UVB (SPF 50) दोन्ही प्रकारचे संरक्षण देणारे 'ब्रॉड-स्पेक्ट्रम' सनस्क्रीन वापरणे आवश्यक असते. हवामानाची पर्वा न करता रोज सनस्क्रीन लावा आणि पुरेशा प्रमाणात वापरा. चेहरा आणि मानेसाठी सुमारे तीन बोटांएवढे सनस्क्रीन घ्या. नियमित सनस्क्रीन वापर केल्याने हायपरपिग्मेंटेशन टाळता येते, मुरुम कमी होतात आणि रोजच्या पर्यावरणातील ताणतणावांपासून त्वचेचे संपूर्ण आरोग्य राखले जाते.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care Mistakes : नकळत तुमची त्वचा तुम्हीच खराब करताय! निरोगी त्वचेसाठी आत्ताच थांबवा 'या' चुका..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement