Diwali Special Train: दसरा-दिवाळीसाठी रेल्वेने करा आरामात प्रवास? कोल्हापूर-कलबुर्गी ट्रेनच्या होणार 116 फेऱ्या

Last Updated:

Diwali Special Train: नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे लोक सणासुदीच्या काळात आपापल्या गावी जातात.

Diwali Special Train: दसरा-दिवाळीसाठी रेल्वेने करा आरामात प्रवास? कोल्हापूर-कलबुर्गी ट्रेनच्या होणार 116 फेऱ्या
Diwali Special Train: दसरा-दिवाळीसाठी रेल्वेने करा आरामात प्रवास? कोल्हापूर-कलबुर्गी ट्रेनच्या होणार 116 फेऱ्या
सोलापूर: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आगामी दसरा-दिवाळी सणांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर विभागातून कोल्हापूर ते कलबुर्गी दरम्यान विशेष गाडीच्या 116 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सणाच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. प्रवाशांनी वैध टिकिटांसह प्रवास करून विशेष सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे लोक सणासुदीच्या काळात आपापल्या गावी जातात. त्यामुळे सणाच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढते. गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर-कलबुर्गी विशेष ट्रेन: 24 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता ही गाडी दररोज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कोल्हापूर येथून निघणार असून त्याच दिवशी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी कलबुर्गी येथे पोहोचेल. तर कलबुर्गी येथून हीच गाडी शुक्रवार वगळता दररोज संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
advertisement
ही गाडी हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अरग, बेलांकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, मसोबा, डोंगरगाव, जवळे, वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी आणि सोलापूर स्टेशनवर थांबणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali Special Train: दसरा-दिवाळीसाठी रेल्वेने करा आरामात प्रवास? कोल्हापूर-कलबुर्गी ट्रेनच्या होणार 116 फेऱ्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement