Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, अधिवेशनातून आली मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता मिळणार?
- Published by:sachin Salve
Last Updated:
Ladki Bahin Yojana Latest Update: यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता कधी मिळणार अशी चर्चा रंगली होती. पण आता 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर : महायुती सरकारला सत्तेत आणण्यामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा असल्याचं मानलं जात आहे. महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा केली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज अधिवेशनामध्ये लाडक्या बहिण योजनेसह इतर पुरवण्या मागण्यांना मंजूर देण्यात आली आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी आता १४०० कोटींचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत. सभागृहात चर्चा झाल्यावर मंजूर करण्यात येईल. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता कधी मिळणार अशी चर्चा रंगली होती. पण आता 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
advertisement
एवढंच नाहीतर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी ३०५० कोटींची तरतूद केलीा आहे. तसंच, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणीसाठी १५०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास घरकुल योजनेसाठी १२५० कोटींची तरतूद केली आहे.
मुंबईमध्ये मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोचं काम झपाट्याने सुरू आहे. पुढील कामासाठी मुंबई मेट्रोसाठी अर्थ सहाय्य म्हणून १२१२ कोटींची मंजुरी दिली आहे. तसंच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ५१४ कोटींची निधी मंजूर केला आहे.
advertisement
लाडक्या बहिणी योजनेत पडताळणी मोहीम नाहीच!
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे. 2100 रुपयांसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तर 1500 रुपये लाभार्थी महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळणार अशी माहिती अदिती तटकरेंनी दिली होती.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत. तर अदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी होणार नाही. मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये अर्जांची छाननी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत तिथे अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी पुन्हा सुरू झाली आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 16, 2024 7:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, अधिवेशनातून आली मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता मिळणार?