घरात आरामात झोपलेलं अख्खं कुटुंब; साखर झोपेत असताना मध्यरात्रीच मृत्यूनं गाठलं, जळगावातील चौघांचा भयानक शेवट

Last Updated:

आता जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात या वादळाने एकाच कुटुंबातील चौघांचा जीव घेतला.

जळगावातील चौघांचा भयानक शेवट
जळगावातील चौघांचा भयानक शेवट
यावल (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : राज्यातील काही भागांमध्ये सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण झाले आहेत. तर, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झाल्याच्या घटना समोर येत राहतात. मात्र, आता जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात या वादळाने एकाच कुटुंबातील चौघांचा जीव घेतला.
सातपुडा पर्वतरांगेला लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबापाणी गावाजवळ ही घटना घडली. यात वादळात मध्यरात्री घर कोसळलं आणि चौघं जागीच ठार झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. यात पती-पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे. या वादळाने अख्खं कुटुंबच उद्धवस्त केलं आहे.
advertisement
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी रात्रीच भेट दिली. यानंतर रात्री या चौघांचे मृतदेह शिवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यावलला वादळाचा तडाखा
यावलला शनिवारी सायंकाळीही वादळाचा तडाखा बसला. त्यात रावेर तालुक्यातील 29 गावांमधील 600 हेक्टर केळी आडवी झाली. 7 गावांत 345 घरांवरील पत्रे उडाले. बोदवडमध्ये 53 खांब, 7 रोहित्र आडवे पडले. यामुळे तालुक्यातील 20 गावे 24 तासांनी सुद्धा विजेविना होती. यावल तालुक्यात 20 गावांना फटका बसला. मुक्ताईनगर तालुक्यात एक हजार हेक्टर केळी आडवी पडल्याचे समोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरात आरामात झोपलेलं अख्खं कुटुंब; साखर झोपेत असताना मध्यरात्रीच मृत्यूनं गाठलं, जळगावातील चौघांचा भयानक शेवट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement