Buldhana News: उपवासाची भगर आणि आमटी खाताच सुरू झाला त्रास; बुलढाण्यात 600 जणांना विषबाधा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
उपवासाची भगर आणि आमटी खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली आहे. 500 ते 600 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे
राहुल खंडारे, बुलढाणा : बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात उपवासाची भगर आणि आमटी खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली आहे. 500 ते 600 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. लोणार तालुक्यातील सोमठाना खापरखेड येथे ही घटना घडली आहे. या प्रकारानंतर विषबाधा झालेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाना खापरखेड येथे धार्मिक कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी अनेकांना उपवास असल्यामुळे भगर आणि आमटी पंगत करून वाटप करण्यात आली होती. इथे जमलेल्या नागरिकांनी ही आमटी आणि भगर खाल्ली. भगर आणि आमटी खाताच अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना उपचारासाठी बीबी येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. काहींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय लोणार सुल्तानपूर येथे हलविण्यात आलं आहे.
advertisement
भगर आणि आमटी खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याचं प्रथम निदर्शनास आलं आहे. यात साधारणतः 500 ते 600 जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकसोबत 500 ते 600 जणांना विषबाधा झाल्याने घटनेची परिसरात चर्चा आहे.
advertisement
पुण्यात 1100 कोटींचे एमडी जप्त
view commentsदुसरीकडे पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी दिवसभरामध्ये केलेल्या कारवायांमध्ये तब्बल 600 किलो पेक्षा अधिक मेफॅड्रोनचा साठा जप्त करण्यात आला आहे. 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केले आहे. विश्रांतवाडी येथील भैरव नगरमध्ये असलेल्या एका गोदामामधून 55 किलो, कुरकुंभ एमआयडीसीमधील एका फॅक्टरीमधून 500 किलोच्या आसपास साठा करून ठेवण्यात आलेला होता. या ठिकाणी एमडीची निर्मिती केली जात होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2024 7:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana News: उपवासाची भगर आणि आमटी खाताच सुरू झाला त्रास; बुलढाण्यात 600 जणांना विषबाधा


