Aaditya Thackeray : भाजपला काय मिळालं..? आदित्य ठाकरेंचा सवाल, गडकरींच्या विधानावरही दिली प्रतिक्रिया
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र भाजपने 2 पक्ष आणि एक परिवार फोडला. पण हे सगळं करून घटनाबाह्य सरकारमध्ये भाजपला काय मिळालं?
उदय जाधव, मुंबई 19 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. गडकरी म्हणाले, “दुकान चालायला लागतं तेव्हा गिऱ्हाईकांची कमतरता नसते. आता आमचं दुकान चांगलं सुरू आहे. गिऱ्हाईकांची कमी नाही. मात्र, खरे जुने गिऱ्हाईक कुठे दिसेना.” त्यांच्या या विधानावरुन आता अनेक नेत्यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आता आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे
आदित्य ठाकरे म्हणाले, की भाजपचे अनेक लोक हेच सांगायला लागेल आहेत. महाराष्ट्र भाजपची परिस्थिती अशी झाली आहे की, 2 पक्ष आणि एक परिवार त्यांनी फोडला. पण हे सगळं करून घटनाबाह्य सरकारमध्ये भाजपला काय मिळालं? त्यांचे जुने आणि भाजपचे जे खरे नेते आहेत ते फक्त 5-6 आहेत, बाकी सगळा इम्पोर्टेड माल आहे. तोही बाकी पक्षांचा रिजेक्टेड माल आहे, अशी टिका आदित्य ठाकरेंनी केली.
advertisement
पुढे त्यांनी सवाल केला, की एवढं सगळं करून महाराष्ट्राला मागे नेत असताना महाराष्ट्र भाजपला काय मिळालं? हा विचार त्यांचे कार्यकर्तेही कधी ना कधी करणारच आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. आदित्या ठाकरे म्हणाले, की मुख्यमंत्री डरपोक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपला सुद्धा ते डरपोक आहेत हे पटलेलं आहे.
advertisement
दरम्यान आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. सिनेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की बालेकिल्ला कोणाचाही नसतो. मी मागच्या वेळीसुद्धा कोणावरही टीका केली नाही. मी युवकांशी चर्चा करण्यासाठी चाललो आहे. कॉलेजेससोबत माझा कार्यक्रम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2023 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Aaditya Thackeray : भाजपला काय मिळालं..? आदित्य ठाकरेंचा सवाल, गडकरींच्या विधानावरही दिली प्रतिक्रिया


