Yoga : 70 वर्षीय तरुण आजोबा! पाण्यावर तरंगत करतात योगासने, पाहा Video

Last Updated:

पोहण्याला सर्वोत्तम व्यायाम मानले जाते त्यामुळे बरेचसे जण पोहण्याचा व्यायाम करत असतात. 70 वर्षीय आजोबा पाण्यावर तरंगत 15 प्रकारची योगासने करण्यात पारंगत झाले आहेत.

+
News18

News18

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : पोहण्याला सर्वोत्तम व्यायाम मानले जाते त्यामुळे बरेचसे जण पोहण्याचा व्यायाम करत असतात. अशातच एक अहमदनगर येथील गृहस्थ गेली 40 वर्षांपासून दररोज सकाळी पोहण्याचा व्यायाम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वय हे 70 वर्षे आहे. आणि त्यातही विशेष बाब म्हणजे हे 70 वर्षीय तरुण आजोबा पाण्यावर तरंगत 15 प्रकारची योगासने करण्यात पारंगत झाले आहेत.
advertisement
मोहन नातू हे अहमदनगर जिल्ह्यातील एक फॅब्रिकेशन व्यवसायिक आहेत. मात्र मागच्या दहा वर्षांपूर्वीच त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली आहे. त्यांना लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. त्यामुळेच नातू हे तरुणांमध्ये पोहण्याची सवय लावून घेण्यासंदर्भात राज्यभर प्रचार देखील करतात. यातूनच ते राज्यभरातील जलतरण तलावांमध्ये पोहणे चालू असते. अशा कित्येक ठिकाणचे पासेस देखील त्यांनी काढून ठेवले आहेत. त्यामुळेच रोज सकाळी साधरण दीड ते दोन तास पाण्यात राहण्याच्या त्यांच्या सवयीमध्ये कधीही खंड पडलेला नाही. साधरण रोज सकाळी साडेसहा ते रात्री 8 वाजे पर्यंत पाण्यातच असतात. त्यांनी कोल्हापूरला नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी नातू यांनी पाण्यावर तरंगत करून दाखवलेल्या योगासनांमुळे सर्वजण अचंबित झाले आहेत.
advertisement
राज्यभरात दाखवली जातात योगासन प्रात्यक्षिके
नुसताच पाण्यावर तरंगण हे देखील पट्टीच्या पोहणाऱ्यांना सहसा जमत नाही. मात्र नातू हे गेली 40 वर्षे नियमित पोहण्याचा व्यायाम करत असल्यामुळे पाण्यावर लीलया जलक्रीडा करत योगासने करतात. तर त्यांच्या योगासनांची प्रात्यक्षिके ते नगरसह कोल्हापूर, नाशिक अशा अनेक ठिकाणी दाखवत असतात.
advertisement
पोहण्या व्यतिरिक्त अजूनही..
मोहन नातू हे एक यशस्वी उद्योजक होते. तरीही ते दहा वर्षांपूर्वी व्यवसायातून निवृत्त झाले आहेत. नियमित पोहण्याच्या छंदातून वयाच्या 60 व्या वर्षी सलग 25 किलोमीटर 8 तास पोहण्याचा एक विक्रमही नातू यांनी स्वतःच्या नावावर केला आहे. तर या व्यतिरिक्त नातू हे दरवर्षी शहिद सैनिकांच्या वीरपत्नींसाठी 1 लाख 11 हजार रुपयांची मदत करत असतात.
advertisement
पाण्यावर करतात ही योगासने
नातू जेव्हा पाण्यावर पूर्णपणे तरंगू शकत होते, तेव्हा त्यांनी त्यातूनच योगासने करण्याचा सराव केला. त्यामुळेच आता मोहन नातू हे पद्मासन, ताडासन, पूर्ण वज्रासन, सूक्ष वज्रासन, वज्रासनात ज्ञानमुद्रा, भद्रासन, मस्त्ययान, पद्मासनात मानेखाली हात धरणे, जानूसंचालन दक्षिणपद, जानूसंचालन वामपद, वक्षविस्तारासन, वक्षविस्तार अर्धपद्मासन (दक्षणपद, उजवा पाय), वक्षविस्तार अर्धपद्मासन (वामपद, डावापाय), शयनस्थितीत धनुरासन ही आसने करण्यात पारंगत झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नाही.
advertisement
कराटे खेळासाठी आयुष्य समर्पित केलेला तरूण; गरीब मुलांना देतोय स्वसंरक्षणाचे धडे Video
दरम्यान आयुष्याच्या उतारवयात नातू यांनी इतक्या सहजपणे अशी योगासने करून आपल्या शरीराला सुदृढ ठेवले आहेच. मात्र विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त असणाऱ्यांना पोहण्याचा व्यायाम आणि योगाचे महत्त्व दाखवून देत इतरांसमोर एक आदर्शच नातू यांनी घालून दिला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Yoga : 70 वर्षीय तरुण आजोबा! पाण्यावर तरंगत करतात योगासने, पाहा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement