Nilesh Lanke : निलेश लंकेंनी सुजय विखेंचं चॅलेंज स्विकारलं, भर सभागृहात करून दाखवलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
Nilesh Lanke Takes Oath in English : लोकसभेत खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला, अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील आज खासदारकीची शपथ घेतली.
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : आज नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली. निलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेताच अहमदनगरमध्ये गुलाल उधळून आणि एकमेंकांना पेढे भरून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये इंग्लिश भाषेमधून शपथ (Nilesh Lanke Takes Oath in English) घेतली आहे, निलेश लंके यांनी शपथ घेताच अहमदनगरमध्ये त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवले. निलेश लंके यांच्या इंग्रजीवरून अनेकदा त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता, मात्र आज त्यांनी इंग्लिशमधून शपथ घेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
निलेश लंके हे सुरुवातीपासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली. भाजपनं या मतदारसंघात पुन्हा एकदा सुजय विखे (Sujay Vikhe) यांना संधी दिली. त्यामुळे निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील देण्यात आली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Loksabha Constituency) अतितटीची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी बाजी मारली. त्यानंतर त्यांनी आज लोकसभेत इंग्रजी भाषेमधून खासदारकीची शपथ घेतली आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा निलेश लंके यांनी सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
June 25, 2024 12:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Nilesh Lanke : निलेश लंकेंनी सुजय विखेंचं चॅलेंज स्विकारलं, भर सभागृहात करून दाखवलं