Crime News : निवृत्त जवानाच्या हत्येचं गूढ अखेर उकललं; थेट मध्यप्रदेशातून गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

Last Updated:

Crime News : अहमदनगर जिल्ह्यातील निवृत्त जवानाच्या हत्येचं गूढ अखेर उकललं आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
अहमदनगर, 31 जुलै : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी जवळ निवृत्त जवान विठ्ठल भोर यांचा काल रविवारी मृतदेह आढळला होता. यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. या हत्येचं गूढ अखेर उलगडलं आहे. त्यांचा प्रॉपर्टीच्या वादातून खुन झाल्याच स्पष्ट झालं असून पोलीसांनी दोन आरोपींना गजाआड केलं आहे.
गुन्हेगाराला मध्यप्रदेशातून अटक
राहाता तालुक्यातील लोणी गावच्या परीसरात रविवारी विठ्ठल भोर या निवृत्त जवानाचा मृतदेह आढळला होता. तीक्ष हत्याराने त्यांच्या छातीवर वार केल्याच्या खुणा असल्याने पोलिसांनी हत्या करणाऱ्यांचा शोध सुरू केला. अहमदनगर शहरात राहणारे विठ्ठल भोर यांचा प्रॉपर्टीच्या कारणातून मनोज मोतीयानी यांचे वाद झाले असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेने त्या दृष्टीने तपास करत मध्यप्रदेशात पळून गेलेल्या मनोज मोतीयानी आणि त्याचा साथीदार स्वामी गोसावी यास ताब्यात घेतले आहे. त्यांनी विठ्ठल भोर यांची हत्या केल्याची कबुली दिली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
वाचा -  लग्नाआधीच्या बॉयफ्रेंडला टीप, नागपूरच्या पोट्टीचा पतीच्याच घरात कांड, Live Video
दरम्यान, नगर शहरातून शनिवारी बेपत्ता झालेले माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर यांचा हा मृतदेह आले आहे. ते हरवले असल्याची नोंद तोफखाना पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलिसांकडून खातरजमा केली असता तो मृतदेह भोर यांचा असल्याचे समोर आले. त्यांचा खून करणाऱ्या दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. लोणी येथील रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मयत भोर यांच्या नातेवाईकांचा पुरवणी जबाब नोंदवल्या नंतर याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/अहमदनगर/
Crime News : निवृत्त जवानाच्या हत्येचं गूढ अखेर उकललं; थेट मध्यप्रदेशातून गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement