Shirdi loksabha : शिर्डीचे माजी खा. स्वगृही परतणार; शिवसैनिकांकडून गद्दार म्हणून विरोध; ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

Last Updated:

Shirdi loksabha : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही म्हणजे ठाकरे गटात परतणार आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयाला शिवसैनिकांनी विरोध केला आहे.

शिर्डीचे माजी खा. स्वगृही परतणार
शिर्डीचे माजी खा. स्वगृही परतणार
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
अहमदनगर, 19 ऑगस्ट : शिर्डीत रामदास आठवले यांचा पराभव करणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वाकचौरे स्वगृही परतणार असले तरी गद्दार नको एकनिष्ठ द्या, अशी मागणी करत शिवसैनिक विरोध करताना दिसताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही प्रत्येक लोकसभा मंतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. अशात वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशाला महत्त्व आलं आहे.
advertisement
2009 साली शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा लढवणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा दणदणीत पराभव केला होता. मात्र, 2014 साली शिवबंधन तोडून काँग्रेसकडून उमेदवारी करणाऱ्या वाकचौरेचा पराभव झाला. नंतर भाजप प्रवेश करून त्यांनी श्रीरामपूरची आमदारकीही लढवली. मात्र, तिथेही अपयश हाती आले. तीच परीस्थिती 2019 झाली आणि सेना भाजपची युती झाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी करत युतीच्या उमेदवाराला आव्हान दिले, तिथेही अपयशच आले. आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदेचा हात धरल्याने वाकचौरे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंबरोबर त्यांची चर्चा झाली असून येत्या 23 तारखेला ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
advertisement
राज्यात राजकीय समिकरणे बदलली असल्याने वाकचौरे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिर्डी मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहील अशी खात्री असल्याने ते उद्धव बाळासाहेब ‌ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मात्र, शिवसेनेशी तीनदा गद्दारी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशाला शिवसैनिक विरोध करताना दिसताहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या बैठकीत एकमताने वाकचौरेना विरोध करण्यात आला आहे.
advertisement
वाकचौरे यांना ठाकरे गटातील शिवसैनिक विरोध तर करत आहेतच. मात्र, काँग्रेसकडून देखील विरोध होताना दिसतोय. शिवसेना आणि काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्याला उमेदवारी दिली जावू नये, अशी भुमिका काँग्रेस घेताना दिसतंय. लोकसभा निवडणुकीत आघाडी होणार की नाही? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. मात्र, आघाडीतील सगळेच जण निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसताहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसैनिकच विरोध करत असल्याने ऊद्धव ठाकरे वाकचौरेंना प्रवेश देणार का? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Shirdi loksabha : शिर्डीचे माजी खा. स्वगृही परतणार; शिवसैनिकांकडून गद्दार म्हणून विरोध; ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष
Next Article
advertisement
Dharashiv News : 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिवचं वातावरण तापलं
'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव
  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

View All
advertisement