विखेंच्या साम्राज्यात अजितदादांची एन्ट्री; तनपुरे कारखाना चालवायला घेणार?

Last Updated:

अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तनपुरे सहकारी साखर कारखाना अजित पवार चालवायला घेणार असल्याची चर्चा रंगू लागली.

अजित पवार आणि शिवाजीराव कर्डीले
अजित पवार आणि शिवाजीराव कर्डीले
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी/अहमदनगर : विखेंच्या साम्राज्यामध्ये अजित पवारांची एन्ट्री होणार का? यावरून चर्चेला उधाण आलं आहे. अहमदनगरच्या राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना चालवण्यात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे हा साखर कारखाना अजित पवार चालवायला घेण्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विखेंचा प्राबल्य असलेल्या जिल्ह्यामध्ये अजित पवार यांची इंट्री होणार का यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडला होता. त्यानंतर या कारखान्यावर अहमदनगर जिल्हा बँकेचं कोट्यवधींचं कर्ज थकीत होतं. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या कारखान्यात निवडणुका जिंकून कारखाना चालवायला घेतला होता. मात्र त्यांना त्यात अपयश आल्याने तो कारखाना पुन्हा बंद पडला. त्यानंतर अहमदनगर जिल्हा बँकेचं त्या कारखान्यावर 130 कोटी रुपयांचा कर्ज होतं. हे कर्ज वसूल करण्यासाठी हा कारखाना चालवण्यात येण्याची प्रक्रिया सुरू करत तीन वेळेस याच टेंडर काढण्यात आलं होतं. मात्र त्या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे या कारखान्याचे टेंडर पुन्हा एकदा काढण्यात येणार आहे.
advertisement
याचदरम्यान अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्याचा आधार घेत हा कारखाना अजित पवार चालवायला घेणार असल्याची चर्चा रंगू लागली.
याबाबत बोलताना अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीवर कर्डीले म्हणाले, कारखाना चालला पाहिजे, बँकेचे पैसे मिळाले पाहिजे, कामगारांना पगार मिळायला हवा, शेतकऱ्यांचे ऊस पण गेले पाहिजे या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला आहे. मग तो साखर कारखाना चालवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांनी किंवा जयंत पाटील यांनीही टेंडर घेतलं तरी आमचा काहीही आक्षेप नाही. तनपुरेंनी कारखान्याचे वाटोळं केलं आहे, त्यांनीही चालवायला घेतला तरी आमची काही हरकत नाही. बँकेला फक्त बँकेचं 134 कोटी वसूल वसूल करून कामगारांचे सव्वाशे कोटी रुपये पगार निघाले पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
विखेंच्या साम्राज्यात अजितदादांची एन्ट्री; तनपुरे कारखाना चालवायला घेणार?
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement