advertisement

पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच परळीत, मुंडे गँगच्या धुडगुसीमुळे दादांचा दौरा चर्चेत

Last Updated:

Ajit Pawar : अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली.

अजित पवार
अजित पवार
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात जात आहेत. सकाळी आठ वाजेपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. परळीत मुंडे गँगच्या धुडगुसीचा नवा व्हिडीओ समोर आल्याने अजित पवार यांचा दौरा चर्चेत आला आहे.
अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचे सादरीकरण यावर चर्चा केली जाणार आहे. अजितदादांच्या या दौऱ्यात माजी मंत्री धनंजय मुंडेही आहेत.

अजितदादांच्या नेतृत्वात नियोजन समितीची बैठक, पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांची उपस्थिती

advertisement
अजित पवार हे सोमवारी परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये विविध बैठका घेतील. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची दुसरी बैठक संपन्न होईल. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. नियोजन समितीची दुसरी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.
advertisement

कायदा सुव्यवस्था प्रश्नी अजित पवारांना विरोधक घेणार, दादांच्या पोलीस प्रमुखांना आधीच सूचना

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात विरोधक अजित पवार यांना घेरण्याची शक्यता आहे. परळीमधील शिवराज दिवटे या तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणावर आज वादळी चर्चा होऊ शकते. परळीत शिवराज दिवटे याला मारहाण करताना मुंडे गँगचा धुडगूस पाहायला मिळाला. या मारहाणीची चित्रफित संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. ही चित्रफित पाहून अजित पवार यांनी बीडचे पोलीस प्रमुख नवनीत कॉवत यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. मारहाण प्रकरणातील आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे कुणीही असू द्या किंवा विरोधी पक्षाचे असू द्यात, त्यांना सोडू नका. चांगली अद्दल घडवा, अशा शब्दात अजित पवार यांनी कॉवत यांना कारवाईचे आदेश दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच परळीत, मुंडे गँगच्या धुडगुसीमुळे दादांचा दौरा चर्चेत
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement