पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, भाजप राष्ट्रवादीसोबत मोठ्या उद्योगपतीची झाली होती बैठक

Last Updated:

शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे कुणीच ओळखू शकत नाही. प्रतिभा काकी देखील त्यांच्या मनातलं ओळखू शकत नाही, असे अजित पवारांनी सांगितले.

अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला होता.मात्र हे सरकार 80 तासात कोसळले होते. या शपथविधीला आता पाच वर्ष उलटून गेले आहेत असे असताना अजित पवारांनी आता पहाटेच्या शपथविधीवर मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 2019 ला सत्तास्थापणेसाठी एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार साहेब, प्रफुल पटेल असे सगळे उपस्थित होते. या बैठकीत उद्योगपती देखील सामील होता,असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केली आहे.
अजित पवार एका मुलाखतीत बोलत होते. या मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. भापज राष्ट्रवादीचं सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत पाच बैठका पार पडल्या होत्या. यातील एक बैठक उद्योगपतीच्या घरी पाडली होती. या एका बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार साहेब, प्रफुल पटेल असे सगळे उपस्थित होते,असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केली आहे. तसेच या बैठकीत उद्योगपती देखील सामील होता.
advertisement
अजित पवार पुढे म्हणाले, त्या गोष्टी आता काढून काही उपयोग नाही. त्या गोष्टीचा सर्व दोष माझ्यावर आला. त्या गोष्टीची सर्व जबाबदारी मी उचलली आणि सर्व नेत्यांना वाचवलं, असे देखील त्यांनी सांगितलं. तसेच मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आलं की, शरद पवार जर बैठकीत होते,मग भाजपसोबत गेले का नाही? असा सवाल विचारण्यात आला होता.यावर अजित पवार म्हणाले की, शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे कुणीच ओळखू शकत नाही. प्रतिभा काकी देखील त्यांच्या मनातलं ओळखू शकत नाही, असे अजित पवारांनी सांगितले.
advertisement
पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर अजित पवार म्हणाले, मी त्याबद्दल अद्याप विचार केला नाही आहे. माझं सध्या लक्ष्य निवडणुकीवर आहे. आणि महायुती विधानसभेच्या 175 जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला. तसेच अजित पवार पुढे म्हणाले मला विचारधारेबद्दल विचारू नका. महाराष्ट्राचं राजकारण बदललंय. प्रत्येकालाच सत्ता हवी आहे, त्यामुळे त्यांनी विचारधारा बाजूला ठेवली आहे. आणि सत्ता स्थापण करून सरकार चालवायचं आहे,असे अजित पवारांनी सांगितले. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप देखील अजित पवारांनी फेटाळला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, भाजप राष्ट्रवादीसोबत मोठ्या उद्योगपतीची झाली होती बैठक
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement