advertisement

... तर अजिबात मागे पुढे पाहू नका, बीड मारहाणीचा VIDEO पाहून अजित पवारांचा पोलीस अधीक्षकांना फोन

Last Updated:

Beed Youth Shivraj Divate Beaten Up: आठ ते दहा गावगुंडांनी शिवराज दिवटे या तरुणाला लोखंडी रॉ, पाईप, कत्ती, लाकडी काठीने जबर मारहाण केली.

अजित पवार
अजित पवार
पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे व्रण महाराष्ट्रवासियांच्या मनातून अजूनही पुसले जात नसताना शुक्रवारी दुपारी परळीत पुन्हा एकदा तश्याच पद्धतीची मारहाण एका युवकाला करण्यात आली. आठ ते दहा गावगुंडांनी शिवराज दिवटे या तरुणाला लोखंडी रॉ, पाईप, कत्ती, लाकडी काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत शिवराज जबर जखमी झाला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत असून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेतील सात आरोपींना परळी पोलिसांनी अटक केली आहे. बाकी आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना अजित पवार यांनी फोन करून आवश्यक त्या तातडीच्या सूचना दिल्या.

एखाद्या प्राण्यालाही कुणी इतकं मारणार नाही, VIDEO पाहून दादाही हळहळले

advertisement
अजित पवार म्हणाले, बीडमधील परळी येथील जी व्हिडीओ क्लिप वायरल झाली, ती मला बघायला मिळाली. एखाद्या प्राण्यालाही कुणी इतकं मारणार नाही, तेवढं त्या पोराला मारलंय. तो व्हिडीओ सुद्धा बघवत नाही. व्हिडीओ पाहून मी पोलीस अधीक्षकांना फोन केला. लवकरात लवकर आरोपींविरोधात कारवाई करा, असे निर्देश मी त्यांना दिले आहेत. त्यात कुणी गुंड प्रवृत्तीचा असेल तर मकोका लावायला मागे पुढे पाहू नका, असेही मी त्यांना सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.
advertisement
मी सोमवारी बीडला येणार आहे. त्याच्या अगोदर कारवाई झाली पाहिजे, असे पोलीस अधीक्षकांना सांगितले आहे. पोलिसांनी सहा ते सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणाबाबत आवश्यक ती सगळी माहिती घेतली आहे. कोणी त्यात गुंड प्रवृत्तीचा असेल तर मकोका लावायला मागे पुढे बघू नका, असे सांगितलं आहे. वाईट प्रवृत्ती आहे, ती ठेचूनच काढली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांना त्याच पद्धतीचे कडक शासन झाले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, असे अजित पवार म्हणाले.
advertisement

पुण्यातील कोयता गँगवर कारवाई करा-अजित पवार

मी पुणे पोलीस आयुक्तांना कोयता गँगवर कारवाई करायला सांगितले आहे. यामध्ये कोणीही सहभागी असेल अगदी सत्ताधारी पक्षाचे असेल किंवा विरोधी पक्षाचे, कुणाचीही गय करू नये, असे सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
... तर अजिबात मागे पुढे पाहू नका, बीड मारहाणीचा VIDEO पाहून अजित पवारांचा पोलीस अधीक्षकांना फोन
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement