Ajit Pawar: मोठी बातमी! बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 6 जण जखमी
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे आज धावती भेट दिली. यावेळी धारूरच्या दिशेने जात त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धारूरकडे जात असताना अचानक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने संबंधित अग्निशामक वाहन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पलटी झाले. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना लातूरकडे जाताना बीडच्या माजलगाव शहरात ताफा थांबवून माजलगाव नगरपालिका निवडणूकी संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली बीड आणि धारूर नगरपालिका राष्ट्रवादी अजित पवार गट लढत आहे.. निवडणुकीवर अजित पवार लक्ष ठेवून आहेत. नियोजित दौऱ्यामध्ये नसताना अचानक ताफा थांबून अजितदादांनी सरप्राईज भेट देत निवडणुकीचा आढावा घेतला.
advertisement
कसा झाला अपघात?
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या वेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकी वाहनाचाही ताबा सुटल्याने दुचाकी स्लीप झाली. या दुचाकीवर पती-पत्नी आणि त्यांची दोन लहान मुले बसलेली होती. अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती प्रसमोर आली आहे. दुचाकीवरील दोन मुलांनाही मार लागला असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच अपघातग्रस्त अग्निशामक दलाच्या वाहनातील दोघे कर्मचारीही जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कशामुळे?
घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत प्राथमिक चौकशी सुरू असून वाहनाच्या वेगासह रस्त्याची स्थिती आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा तपास केला जात आहे.
advertisement
घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला झालेल्या या अपघातामुळे सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. धारूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 4:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: मोठी बातमी! बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 6 जण जखमी


