Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंच्या आजारी उमेदवाराची अजितदादांनी उडवली खिल्ली, 'धडधाकड...'

Last Updated:

खरं तर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना तर अजित पवार यांनी लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून हेमंत ओगळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार काय म्हणाले?
हरीष दिमोटे,अहिल्यानगर : महायुतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काही जागांवर मैत्रिपुर्ण लढत होतायत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूर मतदार संघात त्यांचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सभा घेणार होते. मात्र अचानक मुख्यमंत्री शिंदेंनी ही सभा रद्द केली होती. यामुळे सभा रद्द झाल्यामुळे भाऊसाहेब कांबळे आजारी पडल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. मात्र अजित पवारांनी काही आजारी बिजारी नाही, धडधाकट आहे तो, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला आता कांबळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खरं तर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना तर अजित पवार यांनी लहू कानडे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून हेमंत ओगळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवार,सुनील तटकरे प्रचार करत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवासा येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्याचवेळी श्रीरामपुर येथे भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ सभेच नियोजन केलं होतं. मात्र ऐनवेळी ती सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांचा रक्तदाब वाढला होता आणि त्यांना अस्वस्थ वाटलं होतं.या घटनेने शिंदेंची सभा रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळेंची आजारी पडल्याच्या बातम्या झळकल्या होत्या.
advertisement
या सर्व घटनेवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीरामपुर विधानसभेत महायुतीचे दोन उमेदवार असून राष्ट्रवादीचे लहू कानडेच अधिकृत उमेदवार असून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून श्रीरामपुरची सभा रद्द करण्यास सांगितली होती, असा अजित पवारांनी सांगितले.तसेच कोणी काही कांडया फिरवतो...काही आजारी बिजारी नाही , धडधाकट आहे...मी जे बोलतो खरे बोलतो अशा शब्दात अजित पवारांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याच्यावर टीका केली.
advertisement
दरम्यान अजित पवारांच्या या टीकेवर आता कांबळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे राज्याचे नेते आहेत ते काहीही बोलू आणि करू शकतात...रात्रीतुन उपमुख्यमंत्री होऊ शकतात ‌तर ते माझी सभा देखील रद्द करू शकतात, असा टोला काबंळेनी पवारांना लगावला.तसेच माझी सभा रद्द झाल्यामुळे माझ्यावर दडपण आलं. त्रास झाला त्यामुळे मी रुग्णालयात उपचार घेतले.मला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निरोप आला तुम्ही काम करत रहा म्हणून मी पुन्हा प्रचारात सक्रीय झालो असुन माझा विजय निश्चित आहे,असा विश्वास कांबळेंनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंच्या आजारी उमेदवाराची अजितदादांनी उडवली खिल्ली, 'धडधाकड...'
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement