Ajit Pawar : रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, अजितदादांनी फटकारलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
माझ्या देखील बॅगा तपासल्या आहेत. परभणी दौऱ्यावर असताना माझ्या देखील बॅगा तपासण्यात आल्या होत्या. बॅगा तपासण्याचा पुर्ण अधिकार आहे. लोकसभेत मुख्यमंत्र्यांच्या देखील बँगा तपासल्या होत्या,असे अजित पवार यांनी सांगितले.
अमरावती : अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं. राणा यांच्या याच विधानावरून आता अजित पवारांनी त्यांना फटकारलं आहे. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहेत, असा टोला देखील अजित पवारांनी राणांना लगावला आहे.
अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवारांनी विरोधकांनी आरोप केलेल्या बँग तपासणीच्या मुद्दा यासह अनेक मुद्यावर भाष्य केले. सोमवारी उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या बँगा तपासल्याच्या घटना घडल्या. या घटनेचा व्हिडिओ देखील उद्धव ठाकरेंनी शेअर केला होता. यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले की, माझ्या देखील बॅगा तपासल्या आहेत. परभणी दौऱ्यावर असताना माझ्या देखील बॅगा तपासण्यात आल्या होत्या. बॅगा तपासण्याचा पुर्ण अधिकार आहे. लोकसभेत मुख्यमंत्र्यांच्या देखील बँगा तपासल्या होत्या,असे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement
अजित पवार पुढे म्हणाले, विरोधकांनी मध्यंतरी तक्रार केली होती,पोलिसांच्या मदतीने या सगळ्या गोष्टी होतात. पण असे असेल तर आमच्यासोबत पोलिसांच्याही गाड्या तपासा, असे अजित पवारांनी सांगितले.
अजित पवार यांनी यावेळी रवी राणा यांची कान उघाडणी केली आहे. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत आहेत लोकं काही काही बोलत असतात आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही विधानसभेला मी पण रवी रानाचा दोनदा समर्थन केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रवी रानाला समजावून सांगितलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
advertisement
वरूडमध्ये अमित शहा यांनी भाजपला मतदान करायचं आहे घड्याळाला नाही, असा सवाल अजित पवारांना केला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, तिथे मैत्रिपुर्ण लढत आहे. देवेंद्र फडणवीस पाच वर्षाकरता माझ्यासोबत राहिले आहेत. महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. एक शेतकऱ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच काम झालेलं आहे. पाच वर्षामध्ये आम्ही निधी भूयारला दिलेला आहे. काल त्यांनी मोठी रॅली काढली होती. त्यामुळे माझी मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघातील नागरीकांना आवाहन आहे की, त्यांनी घड्याळच चालवाव, मी शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 12, 2024 12:15 PM IST


