Ajit Pawar On Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काकांची गुगली, अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या मुद्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पु्न्हा एकदा गुगली टाकली आहे. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.
मुंबई: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या मुद्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल, अशी चर्चा सुरू होती.
काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे आणि इतर नेते निर्णय घेतील, आपण त्यात नसणार असे शरद पवार यांनी अनौपचारिक भाष्य केले होते. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पक्षाचे नेतृत्व निर्णय घेतील. मात्र, आपण त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी नसणार, असे शरद पवारांनी अनौपचारिकपणे म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली.
पिंपरी-चिंचवड येथे पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. पवार यांनी संधीसाधूपणाचं राजकारण करू नका असे आवाहन केले. त्याच वेळी मात्र त्यांनी सगळे बरोबर घेता येतील. पण सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको असे स्पष्ट वक्तव्य केले. पवारांच्या वक्तव्याने आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
अजित पवार यांनी काय म्हटले?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सावध पवित्रा घेतला होता. अजित पवार यांनी आज शरद पवारांच्या वक्तव्यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला आपलं मांडण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. त्यानंतर त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.
advertisement
शरद पवार यांनी आपल्या भाषणात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही भाष्य केले. आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागणार असल्याचे म्हटले. भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी असा विकास करायचा आहे, यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका असे पवार यांनी यावेळी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2025 2:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar On Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काकांची गुगली, अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला...