अजित पवार नेहमी गुलाबी जॅकेट का घालतात? जाहीरनाम्यापूर्वी मोठा खुलासा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गुलाबी कँपेन सूरु केले आहे.अजितदादा आता प्रत्येक व्यासपीठावर गुलाबी जँकेटवर दिसतात.त्याचं सभास्थळ देखील गुलाबी रंगातच न्हाऊन निघालेलं दिसतं.अशात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘न्यूज १८ लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुलाबी जँकेट घालण्यामागचं मोठ सीक्रेट सांगितलं आहे. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुलाबी जॅकेटवर बोलताना अजित पवार म्हणाले की,माझ्याकडे अनेक जॅकेट आहेत. पण सगळ्यांना हाच रंग आवडल्याने मी तोच रंग कायम ठेवला. त्यामागे असं काही खास कारण नाही. सगळ्यांना तो रंग आवडला, म्हणून तो पेहराव्यात आणल्याचे अजितदादांनी सांगितले. तसेच तो रंग गुलाबी नाही, जांभूळ खाल्ल्यानंतर बीचा जो रंग असतो, तो तसा रंग आहे, असे देखील अजित पवारांनी सांगितले. पवार कुटुंबातील फुटीवर काय म्हणाले? पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवर देखील अजित पवारांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबात फूट पडेल राजकारणामुळे असं मला कधीच वाटलं नव्हतं.पण १०० टक्के तसं झालं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तसेच मी सूनेत्राला उभं करायला नको होतं. ती माझ्याकडून चूक झाली. हे मी १० वेळा सांगितलं आहे. पण आता विधानसभेला कुणी योग्य केलं की अयोग्य केलं हे आता जनताच ठरवेल, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
बारामती : राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गुलाबी कँपेन सूरु केले आहे.अजितदादा आता प्रत्येक व्यासपीठावर गुलाबी जँकेटवर दिसतात.त्याचं सभास्थळ देखील गुलाबी रंगातच न्हाऊन निघालेलं दिसतं.अशात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘न्यूज १८ लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुलाबी जँकेट घालण्यामागचं मोठ सीक्रेट सांगितलं आहे.
न्यूज १८ लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुलाबी जॅकेटवर बोलताना अजित पवार म्हणाले की,माझ्याकडे अनेक जॅकेट आहेत. पण सगळ्यांना हाच रंग आवडल्याने मी तोच रंग कायम ठेवला. त्यामागे असं काही खास कारण नाही. सगळ्यांना तो रंग आवडला, म्हणून तो पेहराव्यात आणल्याचे अजितदादांनी सांगितले. तसेच तो रंग गुलाबी नाही, जांभूळ खाल्ल्यानंतर बीचा जो रंग असतो, तो तसा रंग आहे, असे देखील अजित पवारांनी सांगितले.
advertisement
पवार कुटुंबातील फुटीवर काय म्हणाले?
पवार कुटुंबात पडलेल्या फुटीवर देखील अजित पवारांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबात फूट पडेल राजकारणामुळे असं मला कधीच वाटलं नव्हतं.पण १०० टक्के तसं झालं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तसेच मी सूनेत्राला उभं करायला नको होतं. ती माझ्याकडून चूक झाली. हे मी १० वेळा सांगितलं आहे. पण आता विधानसभेला कुणी योग्य केलं की अयोग्य केलं हे आता जनताच ठरवेल, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Nov 06, 2024 11:33 AM IST











