अजित पवारांच्या नेत्याचा फडणवीसांवर कडाडून प्रहार, पडळकरांनाही धुतलं, ईडी सीबीआयच्या....

Last Updated:

सांगलीच्या कवठे महंकाळमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात माजी आमदार विलासराव जगताप यांनी यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले.

गोपीचंद पडळकर-देवेंद्र फडणवीस-विलास जगताप
गोपीचंद पडळकर-देवेंद्र फडणवीस-विलास जगताप
असिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी कर्ज माफीवरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली. सांगलीच्या कवठे महंकाळमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात माजी आमदार विलासराव जगताप यांनी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले. महायुतीत असूनही फडणवीस यांच्यावर आमदार फोडाफोडी, ईडी, सीबीआयअशा मुद्द्यांवरून जगताप यांनी टीका केल्याने राजकीय वर्तुळात सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस गोडबोल्या माणूस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा बदमाश आणि गोडबोल्या माणूस आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रचे वाटोळे केले. ईडी, सीबीआय , इन्कम टॅक्स या खात्याचा वापर करुन महाराष्ट्रामधील पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. त्यामुळे भाजपात आज दिसत असलेली नेत्यांची गर्दी ही या खात्याच्या कारवाईच्या भीतीपोटीची गर्दी असल्याचे म्हणत जगताप यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
advertisement

सरकारकडून भांडणं लावण्याचे काम, आम्हीही सरकारमध्ये आहोत पण आधी शेतकरी बाकी नंतर....

जत विधानसभा मतदारसंघात बाहेरून लोक येतात, पैसे वाटतात आणि आमदार होतात. गोपीचंद पडळकर जतमध्ये महिनाभरात आला आणि आमदार झाला. जातीयवाद आणि पैशाच्या जोरावर जतमध्ये कुणी पंधरा दिवसात तर कुणी महिनाभरात येऊन आमदार होतो, असे म्हणत विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. तर जातीजातीत आणि धर्माधर्मात भांडणे लावण्याचे आणि नको ते विषय उकरून काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा उद्योग सध्या सरकार कडून सुरू आहे. आम्ही पण सध्या सरकारमध्ये आहोत पण आधी शेतकऱ्यांसोबत आहोत, असेही विलासराव जगताप म्हणालेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांच्या नेत्याचा फडणवीसांवर कडाडून प्रहार, पडळकरांनाही धुतलं, ईडी सीबीआयच्या....
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement