अनिल पाटील तोंडावर पडले, अजित पवार यांनी स्पष्टपणे 'तो' दावा खोडून काढला!

Last Updated:

Ajit Pawar: शरद पवार गटाचे काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, या वृत्ताने राष्ट्रवादीच्या पवार गटात खळबळ माजली होती.

अनिल पाटील आणि अजित पवार
अनिल पाटील आणि अजित पवार
छत्रपती संभाजीनगर : आमच्याशी व्यक्तिगत संबंध असलेले काँग्रेस आणि शरद पवार गटातील अनेक आमदार आम्हाला संपर्क करीत आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील, असा दावा अजित पवार गटाचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी केला. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्याने आपले पुढील भवितव्य काय असेल, याची काळजी विरोधी पक्षातल्या आमदारांना लागून राहिली आहे. त्यातील बहुतांश आमदार आमच्या संपर्कात असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.
शरद पवार गटाचे काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, या वृत्ताने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली होती. बुधवारी अजित पवार छत्रपती संभाजीनगला एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांनाच याचविषयी विचारले.
शरद पवार गटाचे आमदार संपर्कात आहेत का?
शरद पवार गटाचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत, असे विचारले असता, निकाल लागून फक्त तीन दिवस झाले. अजून कशातच काही नाही. मात्र काही जण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडून आलेल्यांपैकी माझ्या संपर्कात कोणीही नाही, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले. एकप्रकारे अनिल पाटील यांचा दावा अजित पवार यांनी थेटपणे खोडून काढला.
advertisement
निवडून आलेल्या आमदारांची मते जाणून घेतली. मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. विजयी आमदारांना मतदारसंघात जायला सांगून जनतेला धन्यवाद देण्यासाठी आभार दौरा आखण्याच्या सूचना आमदारांना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
आमदार अस्वस्थ, आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात, अनिल पाटील काय म्हणाले होते?
राज्यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातील काही लोकांशी आमचे जवळचे संबंध असल्याने सत्तागटात येण्यासाठी ते इच्छुक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे काही लोक आमच्या संपर्कात असून पुढील काहीच दिवसांत त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील, असे अनिल पाटील यांनी निकालानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अनिल पाटील तोंडावर पडले, अजित पवार यांनी स्पष्टपणे 'तो' दावा खोडून काढला!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement