शाळांमध्ये चाललंय काय? अकोल्यात 4 महिन्यांपासून शिक्षकाकडूनच 6 मुलींचा लैंगिक छळ

Last Updated:

अखेर पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांसमोर वाचा फोडली आणि यानंतर नराधम शिक्षकाचं विकृत कृत्य उघडकीस आलं.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
अकोला : बदलापूर , पुणे येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात ताजे असतानाच आता अकोला जिल्ह्यातूनही असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याचं उघड झालं आहे. गेल्या 4 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांसमोर वाचा फोडली आणि शिक्षकाचं विकृत कृत्य उघडकीस आलं.
काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील ही घटना. प्रमोद सरदार असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केला आहे. हा शिक्षक गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील या मुलींचा छळ करत होता. 8 वीच्या विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्याच प्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पा ही मारायचा.
अखेर पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांसमोर वाचा फोडली आणि यानंतर शिक्षक प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आलं. पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. या संताप जनक घटनेचे माहिती मिळताच उरळ पोलिसांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तत्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली. आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध पॉस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  आज या शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
advertisement
याप्रकरणी माजी महिला आयोग समितीच्या सदस्य आशा मिरगे यांनी थेट पोलीस आणि पालकमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहे. सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आरोपी शिक्षकासह या शाळेतील कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळायला सुरुवात झालीय आणि त्यामुळे आता अकोल्यातील राजकारण सुद्धा पेटण्याची चिन्हे आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
शाळांमध्ये चाललंय काय? अकोल्यात 4 महिन्यांपासून शिक्षकाकडूनच 6 मुलींचा लैंगिक छळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement