मिरची पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात?, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
मिरची पिकाचे नुकसान होण्याची कारणे अती पाऊस, सदोष मिरचीचे रोप, मिरचीच्या लागवडीमध्ये उशीर, चुकीच्या पद्धतीने लागवड अशी अनेक कारणे आहेत. मिरची पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत ते आज आपण जाणून घेऊयात.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती - अमरावती जिल्ह्यात यावर्षी मिरची पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. काही मोजक्या लोकांची मिरची बऱ्यापैकी आहे. तर अनेकांनी मिरची उपटून फेकली आहे. अती पाऊस, सदोष मिरचीचे रोप, मिरचीच्या लागवडीमध्ये उशीर, चुकीच्या पद्धतीने लागवड ही मिरची पिकाचे नुकसान होण्याची कारणे आहेत. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, ते आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
अमरावती येथील कृषीतज्ज्ञ श्यामसुंदर ताथोडे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मिरची पिकाचे नुकसान होण्यापासून वाचवायचे असेल तर शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये सर्वात आधी मिरचीचे रोप महत्वाचे आहेत. आपण मिरचीचे रोप आणले ते नेमके कसे आहे? ते सदोष आहेत का? या सर्व गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे. काही वेळा मिरचीचे रोपच खराब असल्याने मिरची पिकाचे नुकसान होते.
advertisement
- त्याचबरोबर मिरची पिकाची लागवड योग्य त्या वेळी करायला पाहिजे. खरीप हंगामातील असेल तर जून ते जुलैमध्ये लागवड करायला पाहिजे. उन्हाळी असेल तर जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये लागवड करायला हवी.
advertisement
advertisement
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 19, 2024 6:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
मिरची पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात?, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती, VIDEO

