Amravati : ही संधी पुन्हा वर्षभर नाही, अमरावतीकर खास तुमच्यासाठी भरलाय मेळा, काय आहे खास?

Last Updated:

अमरावतीमधील सायन्स स्कोअर मैदानावर दरवर्षी उत्सव मेला भरतो. उत्सव मेला 2025 सुद्धा एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू झालेला आहे. याठिकाणी दरवर्षी काही न काही आकर्षण असते. यावर्षी येथील फिश टर्नल हे आकर्षण ठरले आहे.

+
Amaravati

Amaravati Utsav Mela

अमरावती : अमरावतीमधील सायन्स स्कोअर मैदानावर दरवर्षी उत्सव मेळा भरतो. उत्सव मेळा 2025 सुद्धा एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू झालेला आहे. याठिकाणी दरवर्षी काही न काही विशेष आकर्षण असते. यावर्षी येथील अंडरवॉटर फिश टनल हे विशेष आकर्षण ठरले आहे. त्याठिकाणी भेट देण्यासाठी अमरावतीकरांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. हा उत्सव मेळा अनेक दिवसांसाठी असतो. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्द व्यक्तीसाठी सुद्धा याठिकाणी तुम्हाला अनेक मनोरंजनाच्या बाबी दिसून येतील. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया.
अमरावतीमधील सायन्स स्कोअर मैदानावर आयोजित केलेला हा उत्सव मेळा बघण्यासाठी 30 रुपये प्रति व्यक्ती असे तिकीट दर आहे. आत जाण्याच्या आधी काउंटरवर आपल्याला तिकीट घ्यावी लागते. त्यानंतर आत प्रवेश मिळतो. आत गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला फिश टनलच्या तिकिटाचे काउंटर दिसेल. ज्याची तिकीट 100 रुपये प्रति व्यक्ती इतकी आहे. या उत्सव मेळ्याचे खास आकर्षण ठरलेले हे फिश टनल अतिशय सुंदर आहे. विविध प्रकारच्या फिश तुम्हाला याठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर आणखी समोर गेलं की छोट्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आपल्याला बघायला मिळतात. छोट्या मुलांसाठी नवनवीन प्रकारचे पाळणे सुद्धा त्याठिकाणी आहेत. त्याचबरोबर शालेय साहित्य आणि इतर अनेक साहित्य अगदी 10 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
advertisement
लाकडी शोभेच्या वस्तू अगदी कमीत कमी किंमतीत 
महिलांसाठी घरगुती वापराचे साहित्य, पर्सेस आणि इतरही अनेक वस्तू याठिकाणी उपलब्ध आहेत. लाकडी वस्तूमधील आरसा, किचेन, घरगुती वापराच्या वस्तू आणि शो पिस सुद्धा परवडेल अशा किमतीत उपलब्ध आहेत. उन्हाळी वाळवणातील सुद्धा अनेक पदार्थ याठिकाणी आहेत. आकाश पाळणा, मौत का कुआ, पन्नालाल आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्व पाळणे याठिकाणी आहेत. त्यासाठी तिकीट दर त्याच्या काउंटरवर लिहलेले आपल्याला दिसतात. 
advertisement
विविध खाण्याचे पदार्थ 
संपूर्ण मेळा फिरून झाल्यानंतर भूक तर लागणारच. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ सुद्धा त्याठिकाणी आहेत. शेगाव कचोरी, मसाला पापड, फ्रूट सॅलड, पावभाजी, डोसा आणि बरच काही येथे तुम्हाला मिळेल. सर्वात शेवटी तुम्हाला पाहिजे तसे पान सुद्धा ठिकाणी मिळेल. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हा उत्सव मेला अतिशय उपयुक्त आहे.
advertisement
हा मेळा नेमका आहे तरी कुठे? 
अमरावती मेन बसस्टॉप जवळ सायन्स स्कोअर मैदान याठिकाणी हा उत्सव मेळा आयोजित केला आहे. तुम्ही कधीही भेट देऊन बघा.
view comments
मराठी बातम्या/अमरावती/
Amravati : ही संधी पुन्हा वर्षभर नाही, अमरावतीकर खास तुमच्यासाठी भरलाय मेळा, काय आहे खास?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement